LSG vs RR : राजस्थानच्या विजयानंतर कॅप्टन संजू सॅमसन काय म्हणाला?

Sanju Samson LSG vs RR : संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी कॅप्टन्सी इनिंग केली. संजूने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध नाबाद 71 धावांची खेळी केली. संजूने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं?

LSG vs RR : राजस्थानच्या विजयानंतर कॅप्टन संजू सॅमसन काय म्हणाला?
sanju samson lsg vs rr ipl 2024,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 12:01 AM

संजू सॅमसन याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामात आठवा विजय मिळवला. राजस्थानने या विजयासह प्लेऑफचं तिकीट जवळपास निश्चित केलय. लखनऊने राजस्थानला विजयसाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानची या विजयी धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात झाली. जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने 60 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर राजस्थानने 18 धावांमध्ये झटपट 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर राजस्थानने जोरदार मुसंडी मारली.

कॅप्टन संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी विजयी नाबाद 127 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने 33 बॉलमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 71 धावांची नाबाद खेळी केली. तर ध्रुव जुरेल 34 बॉलमध्ये नॉट आऊट 52 धावा केल्या. राजस्थानचा हा 9 सामन्यातून 8 वा विजय ठरला. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. संजू सॅमसन याने या विजयानंतर काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

संज सॅमसन काय म्हणाला?

“जुन्या बॉलने बॅटिंग करणं सोपं झालं. हा एक चांगला सांघिक प्रयत्न होता. आम्ही सुरुवातीच्या ओव्हरर्समध्ये वरचढ होण्याचा प्रयत्न करतो आणि तयानंतर सुरक्षित बाहेर पडतो. आम्ही चांगलं करतोय, असं मला वाटतं. डावाची सुरुवात आणि शेवट खरोखरच चांगली होती. मिडल ऑर्डरमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली”, असं संजूने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.

ध्रुव जुरेलंच कौतुक

“टी 20 क्रिकेटमध्ये पाचव्या स्थानी बॅटिंग करणं अवघड आहे. आम्ही ध्रुववर कायम विश्वास ठेवला आहे. त्याच्या चांगल्या बॅटिंगचं श्रेय हे टीम मॅनेजमेंटचं आहे. ध्रुवने आज चांगली कामगिरी केली. आम्ही नशीबवान आहोत. जे करतोय त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करु”, असं म्हणत संजूने ध्रुवंचं कौतुक केलं आणि टीमच्या भविष्यातील चांगल्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्त केला.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकूर.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.