AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठी बातमी, थेट बैठकीत…

अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच अनेकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. त्यामध्येच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दावा केला जात आहे. नुकताच देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत नक्की काय घडले याबाबत माहिती पुढे आली.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठी बातमी, थेट बैठकीत...
NCP meeting
| Updated on: Feb 17, 2026 | 11:13 AM
Share

मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी झाला. सुरूवातीला अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ते गंभीर जखमी असल्याचे सांगितले गेले. पण काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे निधन झाल्याचे कळताच मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वाद पुढे आला. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अनेक दावे करण्यात आली. विलिनीकरण होणार होते, असे स्वत: शरद पवार यांनीही म्हटले. पण अजित पवार यांच्या निधनानंतर चर्चा थांबल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी अगोदर चर्चा केली.

अजित पवार गटातील अनेक आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, हे थेटपणे बोलूनही दाखवले. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली. आता नुकताच झालेल्या राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये नक्की काय घडले हे सांगताना आता हिरामण खोसकर हे दिसत आहेत. विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली का? यावरही त्यांनी उत्तर दिले.

हिरामण खोसकर यांनी म्हटले की, बैठका आणि वाहतूककोडींमुळे मला बैठकीला जाण्यास उशीर झाला. मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेटलो. मी बैठकीला थोडे उशिराने गेल्याने काय चर्चा झाली याबाबतची मला माहिती मिळाली नाही, पण मी तिथे गेलो. त्यांनी एकच सांगितले की, आमचा कुटुंबातील विषय आहे, पुढे काय करता येईल हे आम्ही बघू.

त्यावर त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केले नाही. पण लेट गेल्याने त्यांची भाषणे वगैरे सर्व अगोदरच होऊन गेले होते. मी एकटाच लेट गेल्याने मी तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि वहिणी आणि पार्थ पवार यांना भेटलो. त्यांनी सांगितले की, आमची काही चर्चा झालेली आहे, पण मला काही माहिती मिळाली नाही. मी लेट गेल्याने मला विलिनीकरणाबाबत माहिती मिळाली नाही. काही आमदारांसोबतही माझी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. तो कुटुंबाचा विषय आहे आणि आपण कोणी बोलणे योग्य नाही, असेही हिरामण खोसकर यांनी म्हटले.

Follow Us
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!