Breaking: बजरंग बली की जय!! पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात

| Updated on: Aug 07, 2021 | 5:19 PM

भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझागिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली. खेर बजरंग पुनियानं मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.

Breaking: बजरंग बली की जय!! पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात
बजरंग पुनिया
Follow us on

टोकियो:  भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत 2 पॉईंट घेतले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकूच कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून 2 पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी 2 पॉईंट घेऊन, आपली आघाडी 6-0 अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.

बजरंग सुरुवातीपासूनचं आघाडीवर

भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली.  कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होती. बजरंग पुनिया या मॅचमध्ये पहिल्यापासून सकारात्मक खेळ करताना दिसून आला. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला 2-0  अशी आघाडी मिळाली होती.  प्रतिस्पर्धीखेळाडू  सुरुवातीपासून नकारात्मक खेळ करताना दिसून आला.

दुसऱ्या राऊंडमध्ये आघाडी भक्कम

बजरंग पुनियानं दुसऱ्या राऊंडमध्ये लागोपाठ 6  गुण मिळवतं आघाडी भक्कम केली आणि त्याचं विजयामध्ये रुपातंर केलं आहे. बजरंग पुनियानं कांस्य पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील राजकीय नेत्यांनी बजरंग पुनियाचं अभिनंदन केलं आहे. भारताकडं आता 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकं झाली आहेत.

नरेंद्र मोदी  यांच्याकडून अभिनंदन

सामन्यामध्ये काय झालं ?

सुरुवातीपासून बजंरग पुनियाने जोरदार प्रदर्शन केले. बजरंग पुनियाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच डॉलेट नियाझबेकोवर दबाव निर्माण केला होता. या दबावाचा फायदा घेत बजरंने आक्रमक पवित्रा धारण करत डॉलेट नियाझबेकोवरशी दोन हात केले. परिणामी खेळात बजरंगने सुरुवातील 2 गुण मिळवले. त्यानंतर सलग 2 वेळा 2 गुण मिळव्यामुळे बजंरच्या पारड्यात तब्बल 6 गुण झाले. या तगड्या लढतीमुळे बजरंगने 6-0 अशी लीड मिळवली. शेवटच्या 50 सेकंदांच्या सामन्यात बजरंने पुन्हा दोन गुण मिळवत सामन्यात 8-0 अशी लीड मिळवली. या दमदार विजयामुळे बजरंगने कांस्यपदक पटकावले.

सेमीफायनलमध्ये पराभव

कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनिया   पराभूत झाला होता.  अझरबैजानचा हाजी अलीयेब (Haji Aliyev) याने पुनियाला 12-5 च्या फरकाने मात दिली होती. पण बजरंगनं आजच्या सामन्यात विजय मिळवला.

अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनं गौरव

25 वर्षीय बजरंग आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. नुकतंच त्याने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं. केंद्र सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार आणि यंदा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे.

2024 ला आमचं एकच इंजिन असणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; चंद्रकांतदादा-राज भेट निष्फळ?

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय