टी20 वर्ल्डकप संघात रवींद्र जडेजाच्या निवडीवरून टॉम मूडी आणि श्रीकांत भिडले! जाणून घ्या काय झालं ते

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यासाठी शेवटचे 48 तास उरले आहेत. त्यामुळे या 48 तासापूर्वीच संघाची घोषणा करावी लागणार आहे. मात्र या संघासाठी बरेच खेळाडू रांगेत उभे आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कापला जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान रवींद्र जडेजाच्या नावावरून बराच वाद पेटला आहे.

टी20 वर्ल्डकप संघात रवींद्र जडेजाच्या निवडीवरून टॉम मूडी आणि श्रीकांत भिडले! जाणून घ्या काय झालं ते
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 5:51 PM

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाची टी20 वर्ल्डकपसाठी निवड करायची आहे. यासाठी निवड समितीकडे शेवटचे 48 तास शिल्लक आहे. त्यामुळे निवड समिती कधीही संघाची घोषणा करू शकते. या संघात अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजाच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. जडेजा भारताच्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याने आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. मात्र टी20 वर्ल्डकप संघात निवड करायची की नाही यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीकांत आणि टॉम मूडी यांची वेगवेगळी मतं आहेत. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडीने सांगितलं की, रवींद्र जडेजा टी20 वर्ल्डकप 2024 साठी भारताचा 7 नंबरचा फलंदाज होऊ शकत नाही. पण टॉम मूडीने अक्षर पटेलऐवजी जडेजाला पसंती दिली. तर जडेजा ऐवजी संघाला अशा खेळाडूची आवश्यकता आहे की तो जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करू शकेल. “मी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोघांनीा घेणार नाही. भारताला चांगल्या डावखुऱ्या गोलंदाजाची आवश्यकता आहे. पण सातव्या क्रमांकावर खेळण्यास सक्षम नाहीत.”, असं टॉम मूडीने सांगितलं.

दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू श्रीकांतने सांगितलं की, “बीसीसीआयला टी20 वर्ल्डकप 2024साठी जडेजा आणि अक्षर पटेल या दोघांनी निवड करणं योग्य ठरेल. अक्षर पटेल ऐवजी जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा घेण्यास सक्षम खेळाडू आहे. जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल. पण अक्षर पटेलला 15 खेळाडूत स्थान असावं. अक्षर पटेलही मॅच विनर खेळाडू आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे. अक्षर पटेल चांगली गोलंदाजी करू शकतो. उत्तम गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षणही करू शकतो. पण माझी पहिली पसंती जडेजाला आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सातव्या क्रमांकासाठी एक मोठा खेळाडू आहे.”

टी20 वर्ल्डकप संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह ही नावं जवळपास निश्चित आहेत.पण इतर खेळाडूंसाठी संभ्रम आहे. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतक ठोकलं आहे.दुसरीकडे विकेटकीपर बॅट्समन म्हणून संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे संघ निवडीसाठी बरेच पर्याय आहेत. त्यामुळे आता कोणाची निवड संघात होते आणि कोणचा पत्ता कापला जातो याची उत्सुकता आहे.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.