माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप…, रवींद्र धंगेकरांची मागणी काय?
रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाणे येथे भाजपविरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांवर करा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप पदाधिकाऱ्यांवर करा, अशी मागणी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुलाखत सुरू असताना थेट डीसीपींना फोन लावला. सहकारनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर काल पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाणे येथे भाजपविरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांचं वाटप भाजपकडून केलं जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. तर भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रवींद्र धंगेकरांनी वसंत मोरेंना टोला लगावला आहे. वसंत मोरे यांना ४ लाख मतं मिळणार असतील तर आमचं डिपॉझिट जप्त होईल, असं म्हणत वसंत मोरेंना रवींद्र धंगेकरांनी खोचक टोला लगावला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

