AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: संस्कार असावे तर असे! वैभवच्या कृतीचे सर्वत्र कौतुक, वृद्ध महिला समोर येताच….Video Viral

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात वैभवच्या संस्काराचे कौतुक होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: संस्कार असावे तर असे! वैभवच्या कृतीचे सर्वत्र कौतुक, वृद्ध महिला समोर येताच....Video Viral
| Updated on: Jul 21, 2026 | 2:33 PM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तीन सामने रंगणार आहे. यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे, आता आयर्लंड  आणि इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका खेळली होती. ही मालिका भारतीय संघाने गमावली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकून भारतीय संघ दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरला भारतीय संघाची धुरा मिळाल्यानंतर एकही टी-20 सामना जिंकता आलेला नाही. आता तो या मालिकेत सामना जिंकवण्यासाठी जोरात प्रयत्न करताना दिसेल. आता या मालिकेत पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीवर लक्ष असणार आहे. आता या मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

23 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी, वैभव सूर्यवंशीला चाहते भेटायला मैदानात आलेले दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वैभव जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे त्याचा चाहतावर्ग पाहायला मिळतो. वैभवची क्रेझ ही लहान मुलांपासून ते मोठ्यामध्येही आहे. आयर्लंड  दौऱ्यात, इंग्लंड दौऱ्यात अशीच चित्र पाहायला मिळाली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वीही अशीच चित्रे पाहायला मिळाली.

वैभव आणि वृद्ध महिलेतील संवाद आता समोर आले आहेत. वृद्ध महिला म्हणाली, “नमस्कार, वैभव, बाळा. माझं संपूर्ण कुटुंब तुझं खूप मोठं चाहते आहे. आम्ही फक्त तुला फलंदाजी करताना पाहण्यासाठी राजस्थानहून झिम्बाब्वेला आलो आहोत. तू इतक्या लहान वयात आम्हाला खूप अभिमान वाटायला लावला आहेस. भारतासाठी धावा करत राहा, आपल्या देशाला गौरव मिळवून देत राहा आणि देव तुला नेहमी यश देवो. हा माझा मनापासून आशीर्वाद आहे.” हे ऐकून वैभव सूर्यवंशी म्हणाला की, “खूप खूप धन्यवाद, आंटी. तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा माझ्यासाठी सर्वस्व आहे.”

आयपीएल 2026 मध्ये 776 धावा केल्यानंतर वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळाले. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तो बेंचवरच राहिला, पण इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने पदार्पण केले. त्याला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातही संधी मिळाली, पण पाचव्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले. या सामन्यांदरम्यान, या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाने अनुक्रमे केवळ 14, 13 आणि 15 धावा केल्या.

23, 25 आणि 26 जुलै रोजी तीन सामने मालिकेचे तीन सामने अनुक्रमे 23 25आणि 26 जुलै रोजी हरारे येथे खेळले जातील. नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती मिळावी म्हणून, CoE चे प्रभारी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. त्यांना सुनील जोशी आणि हृषिकेश कानिटकर मदत करतील.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?