AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियात लवकरच पदार्पण ? मोठी अपडेट समोर, BCCI ने ..

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 मधील दमदार कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. BCCI सचिव देवजित सैकिया यांनी निवड समितीला वैभवच्या हिताचे निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 'वंडर बॉय' म्हणून नावाजल्या गेलेल्या वैभवला लवकरच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियात लवकरच पदार्पण ? मोठी अपडेट समोर,  BCCI ने ..
वैभव सूर्यवंशी
| Updated on: Jun 02, 2026 | 1:44 PM
Share

आयपीएल 2026 मधील आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने अव्वल फलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण तर केलंच पण सर्वांचं लक्षही वेधून घेतलं. सध्या सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून प्रत्येकाच्या तोंडी त्याचीच चर्चा आहे. याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या निवड समितीला विशिष्ट सूचना मिळाल्या आहेत. BCCI सेक्रेटरी सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय संघाची निवड करणारे, चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि त्यांच्या टीमला विशेष निर्देश दिलेत. वैभव सूर्यवंशीसाठी जे करणं गरजेचं आहे, ते ते करा, असं सांगण्यात आलंआहे. “वैभव म्हणजे वेगळच रसायन आहे, त्याचं टॅलेंट अद्वितीय आहे.तो भारतीय क्रिकेटचा ‘वंडर बॉय’ आहे, भविष्यात जगभरात आपली छाप सोडण्यास तो सज्ज आहे. वैभवसाठी आणि त्याच्या हितासाठी जे सर्वोत्तम असेल तेच निवड समिती करेल” असं हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सैकिया म्हणाले.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर खेळणार वैभव सूर्यवंशी ?

भारताचा आयर्लंड आणि इंग्लंड दौरा लवकरच सुरू होणार असून अशा वेळीच देवजीत सैकिया यांनी हे वक्तव्य केलं आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या या दौऱ्यांसाठीचा संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशीच्या समावेशाबद्दल आधीच चर्चा सुरू असताना, सैकिया यांच्या वक्तव्यामुळे त्याच्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

काय म्हणाले सैकिया ?

वैभवच्या कामगिरीमुळे आम्हीसगळेच खुश आहोत, असं सैकिया म्हणाले.  ” तो भारतीय क्रिकेटचा ‘वंडर बॉय’ आहे. मला खात्री आहे की तो भविष्यात जगभरात आपली छाप पाडेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ” आयपीएल 2026 दरम्यान टीम इंडियाचे सर्व सिलेक्टर्स उपस्थित होते. त्यांनी सामने बारकाईने पाहिलेत. वैभवने ज्याप्रकारे कामगिरी केली, ते पाहता मला अशी आशा आहे की जेव्हा ते (सिलेक्टर्स) आयर्लंड आणि इंग्लंडसाठी संघ निवडतील, तेव्हा ते वैभवसाठी जे सर्वोत्तम असेल तेच करतील”, असं सैकिया यांनी नमूद केलं.

खरंतर टीम इंडियाच्या निवड बैठकांना कर्णधार आणि भारतीय निवड समितीसोबतच, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया हे देखील उपस्थित असतात. त्यामुळे, त्यांचं हे वक्त्वय म्हणजे, भारतीय निवड समितीला दिलेला एक निर्देश असंच पाहिलं जात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलंय.

दिग्गजांकडून वैभवचं कौतुक

क्रिकेटमधील दिग्गजही वैभव सूर्यवंशीच्या खेळाचे कौतुक करताना दिसले. वैभवला आता काहीही सिद्ध करणं बाकी नाही आणि तो भारतीय संघाकडून खेळायला तयार आहे, असं मत काहींनी मांडलं. या क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजय जडेजा, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही वैभवची तारीफ केली होती, तेव्हा अजित आगरकरही तिथे उपस्थित होते.

Follow Us
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?