Duleep Trophy Final : सगळ्यांचं लक्ष वैभववर होतं, पण सूर्यवंशीला जे जमलं नाही ते दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये या 21 वर्षाच्या मुलाने करुन दाखवलं

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अपयशी ठरला. लौकीकाला साजेसा खेळ त्याला दाखवता आला नाही. वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनकडून उपकर्णधार म्हणून खेळत होता.

Duleep Trophy Final : सगळ्यांचं लक्ष वैभववर होतं, पण सूर्यवंशीला जे जमलं नाही ते दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये या 21 वर्षाच्या मुलाने करुन दाखवलं
Shikhar Mohan
Image Credit source: x
| Updated on: Sep 06, 2026 | 4:29 PM

आज चेपॉकवर साऊथ झोन आणि ईस्ट झोनमध्ये दुलीप ट्रॉफीची फायनल सुरु आहे. या मॅचमध्ये सगळ्यांचं लक्ष 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीवर होतं. कारण आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये वैभवने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. वैभव फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यावेळी कॅमेऱ्याचं त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होतं. पण पहिल्या दिवसाच्या खेळात चहापानाची वेळ झाली, त्यावेळी वैभव ऐवजी दुसऱ्याच मुलाच्या नावाची चर्चा होती. तो चर्चेच्या केंद्रस्थानी होता. वैभव सूर्यवंशी तरी ईस्ट झोनसाठी सेमीफायनलमध्ये खेळला होता. पण झारखंडच्या 21 वर्षाच्या शिखर मोहन या मुलाला फायनलमध्ये पहिली संधी मिळाली. तो राखीव ओपनर होता. फायनल सारख्या महत्वाच्या सामन्यात त्याने पहिल्या इनिंगमध्ये 85 धावांची खेळी केली. 120 चेंडूत 85 धावांची खेळी करताना त्याने 9 चौकार आणि तीन षटकार लगावले.

सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सेमीफायनलमध्ये 92 आणि 40 धावांची खेळी केली होती. आज फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने सेंट्रल झोनला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने 37 धावात 44 धावा केल्या. यात टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद सिराजच्या एका ओव्हरमध्ये 14 धावा लुटल्या. वैभवने त्याला दोन चौकार आणि एक षटकार लगावला. अभिमन्यू ईश्वरनसोबत वैभवने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ईस्ट झोनला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 100 धावा जोडल्या. चामा मिलिंदच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. शॉर्ट चेंडूवर पुल मारताना तो कॅचआऊट झाला.

207 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या

वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अपयशी ठरला. लौकीकाला साजेसा खेळ त्याला दाखवता आला नाही. वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनकडून उपकर्णधार म्हणून खेळत होता. शिखर मोहनचा हा पहिलाच सामना होता. अंडर 23 स्तरावरच्या प्रदर्शनामुळे शिखर मोहनचा ईस्ट झोनच्या टीममध्ये समावेश झाला. 2023-24 ला सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेत त्याने नऊ इनिंगमध्ये 77.88 च्या सरासरीने 623 धावा केल्या होत्या. त्याच्या पुढच्या सीजनमध्ये याच स्पर्धेत त्याने 13 डावात 73.92 च्या सरासरीने 887 धावा केल्या होत्या. 2025-26 च्या सीजनमध्ये शिखर मोहनने रणजी स्पर्धेत डेब्यू केला. शिखर मोहनने 12 डावात 55.73 च्या सरासरीने 613 धावा केल्या. यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 207 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us