Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. ही टी-20 मालिका गाजवण्यासाठी आता वैभव सूर्यवंशी सज्ज झाला आहे. वैभवचा असाच एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 16, 2026 | 9:02 AM

वैभव सूर्यवंशीचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण संस्मरणीय ठरले नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले, पण त्याला आपला एकही डाव टिकवता आला नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा केल्या. परिणामी शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात वैभवला संघातून वगळले आणि संजू सॅमसनला संघात पुन्हा जागा मिळाली. आता वैभवला पुन्हा मैदान गाजवण्याची संधी मिळणार आहे आणि तो ती संधी अजिबात वाया घालवायची नाही म्हणून आतापासूनच सरावाला लागला आहे. या संदर्भातील वैभवचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडच्या या दौऱ्यानंतर, वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहे, जिथे तो तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. इंग्लंडमधील 0-4 अशा निराशाजनक पराभवानंतर, वैभव प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा, विम्बल्डन पाहताना दिसला, जिथे तो अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि युवराज सिंग यांच्यासोबत उपस्थित होता. यावेळी बेबी बॉसच्या लूकची खूपच चर्चा रंगली. वैभवचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले. आता यानंतर तो लगेचच कामाला लागला आहे.  वैभव सूर्यवंशीचे नागपूरमधील राजस्थान संघाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये विशेष स्वागत करण्यात आले. व्हिडिओमध्ये, संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोन रांगांमध्ये उभे राहून मानवंदना देत आहेत.

राजस्थान रॉयल्सने या व्हिडिओला ‘बॅक टू वर्क’ असे कॅप्शन दिले आहे, ज्याचा अर्थ असा आहे की मैदानावर कठोर परिश्रम आणि तयारीचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. असे मानले जाते की, वैभव इंग्लंड दौऱ्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये दाखल झाला आहे, जिथे तो आगामी मालिकेसाठी जोरदार सराव करेल.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला टी20 सामना: 23 जुलै, 2026 (गुरुवार), हरारे, सायंकाळी 4:30 वाजता
दुसरा टी20 सामना: 25 जुलै, 2026 (शनिवार), हरारे, सायंकाळी 4:30 वाजता
तिसरा टी20सामना: 26 जुलै, 2026 (रविवार), हरारे, सायंकाळी 4:30 वाजता

Follow Us