AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: विराट बसमध्ये चढल्यानंतर बॉडीगार्डने दाखवला माज, इंग्लंडमध्ये वादात अडकला कोहली

India vs England: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान एका नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. हा वाद विराट कोहलीच्या आसपास फिरत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्या बॉडीगार्डने उद्धट वर्तन केल्याने वाद उफाळून आला आहे.

Video: विराट बसमध्ये चढल्यानंतर बॉडीगार्डने दाखवला माज, इंग्लंडमध्ये वादात अडकला कोहली
विराट बसमध्ये चढल्यानंतर बॉडीगार्डचा माज, इंग्लंडमध्ये वादात अडकला कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: Jul 15, 2026 | 10:09 PM
Share

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 6 गडी राखून इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यात विराट कोहलीची जादू काही चालली नाही. 6 चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या 5 धावा करून बाद झाला. त्यामुळे आधीच विराट कोहलीची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींमध्ये चिंता आहे. पण असं असताना विराट कोहली एका मोठ्या वादात अडकला आहे. विराट कोहलीच्या बॉडीगार्डने इंग्लंडमध्ये भारतीय पत्रकारांसोबत गैरवर्तन केलं. तसेच भारतीय पत्रकारांना घाणेरड्या शिव्या दिल्याचा आरोप आहे. सर्व पत्रकार संघापासून लांब उभे राहून टीम बसचा व्हिडीओ चित्रित करत होते. तेव्हा विराट कोहलीचा बॉडीगार्ड भडकला आणि त्याने भारतीय पत्रकारांना धमकावणं सुरू केलं.

विराट कोहलीच्या बॉडीगार्डने काय केलं?

इंग्लंडमध्ये वनडे मालिकेचं वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार शुभायन चक्रवर्ती गेले आहेत. शुभायन चक्रवर्ती यांच्या दाव्यानुसार, विराट कोहलीच्या बॉडीगार्डने तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांसोबत गैरवर्तन केलं. शुभायन यांनी एक्सवर पोस्ट करत आरोप केला की, ‘हा विराट कोहलीचा बॉडीगार्ड आहे. एक माध्यम प्रतिनिधी संघाच्या प्रस्थानाचे चित्रीकरण करत होता आणि चाहत्यांसोबत उभा होता. त्याला तसे करण्याची परवानगी होती. पण विराट बसमध्ये चढल्यानंतर, हा बॉडीगार्ड त्या माध्यम प्रतिनिधीकडे गेला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. तो म्हणाला, ‘इथून निघून जा. इथून निघून जा.’ जेव्हा त्या माध्यम प्रतिनिधीने आपण पत्रकार असून आपल्याकडे ओळखपत्र असल्याचे दाखवले, तेव्हा बॉडीगार्ड म्हणाला, ‘त्याला परवानगीची पर्वा नाही. इथून निघून जा.’ तो त्याला वारंवार शिवीगाळ करत राहिला. हे पूर्णपणे चुकीचे आहे.’

विराट कोहलीसोबत पर्सनल बॉडीगार्ड कसा?

विराट कोहली स्वत:सोबत पर्सनल बॉडीगार्ड घेऊन जाण्याचं कारण काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण बीसीसीआय टीम इंडियाच्या मालिकेदरम्यान सर्व खेळाडूंच्या सुरक्षेची व्यवस्था करते.संपूर्ण संघासोबत गार्ड्स असतात. त्यामुळे कोणताही खेळाडू खासगी बॉडीगार्ड घेऊ फिरू शकत नाही. मग हा नियम विराट कोहलीसाठी वेगळा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान,  विराट कोहलीच्या बॉडीगार्डने एक फॅनचा मोबाईल खेचून फोडला होता, असाही आरोप होत आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये विराट कोहली पर्सनल बॉडीगार्डच्या गैरवर्तनामुळे वादात आला आहे.

Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....