AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमार, दोन्ही निवडणूक आयुक्तांना धडाधड नोटीस, राहुल गांधींना फटकारलं; धाबे दणाणले

राहुल गांधींच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश दिले आहेत. तसेच, न्यायालयाने राहुल गांधींना कोर्टाबाहेरील वर्तनाबद्दल फटकारले असून, केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि निवडणूक आयोगालाही नोटीस दिली आहे. कोर्टाला कोणी धमकावू शकत नाही, असे स्पष्ट केले.

मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमार, दोन्ही निवडणूक आयुक्तांना धडाधड नोटीस, राहुल गांधींना फटकारलं; धाबे दणाणले
Supreme court Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 1:14 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच कोर्टाच्या बाहेर केलेल्या आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनाही फटकारलं आहे. कोर्टाला अशा पद्धतीने कोणी धमकावू शकत नाही, अशा शब्दात कोर्टाने राहुल गांधी यांना फटकारलं आहे. कोर्टाने आज नोटिसांचा धडकाच सुरू केला आहे. निवडणूक आयोगासह दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारलाही कोर्टाने नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या याचिकेची दखल घेतली आहे. या याचिकेवरून कोर्टाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधींच्या कोर्टातील वर्तणुकीवरही कोर्टाने स्पष्टीकरण मागितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या परिसरात समर्थकांसोबत राहुल गांधी गेले होते त्यावर स्पष्टीकरण द्या, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. कोर्टाला कोणीही धमकावू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल

यावेळी कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. सरकारने आपल्या निर्णयाचा खुलासा केला असून त्याचं कारण शपथपत्रात दिलं आहे. सुनावणीवेळी कोर्टाने 12 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांच्याकडून जे वर्तन करण्यात आलं, त्यावर सवाल केला आहे. तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, असं कोर्टाने राहुल गांधी यांना बजावलं आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली आहे. दरम्यान, एसआयआरशी संबंधित याचिकेवर एकसाथ सुनावणी होणार आहे. तर आंदोलकांवर घातलेल्या निर्बंधावरील याचिकेवर वेगळी सुनावणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारला नोटीस

दरम्यान, राहुल गांधी आणि इंडिया ब्लॉकने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने मुख्य निवडणूक आयुक्त, दोन्ही निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. तसेच जंतरमंतर ही आंदोलनाची जागा डीनोटिफाय करण्ता आली आहे. त्यावरही कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरून कोर्टाने केंद्र सरकार, दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे. त्यावर केंद्र सरकारला आता उत्तर द्यावं लागणार आहे.

Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....