AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?

Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?

| Updated on: Oct 15, 2026 | 1:07 PM
Share

दिल्लीतील निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या या भेटीत देशातील राजकीय घडामोडी, विशेषतः विरोधकांच्या एकजुटीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीतील महत्त्वाच्या घडामोडींवर या दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या संपूर्ण देशात विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख आहे. दिल्लीतील या आंदोलनात राहुल गांधी आणि इंडिया अलायन्सचे अनेक नेते सहभागी आहेत. संजय राऊत स्वतः गेली तीन दिवस या आंदोलनात उपस्थित होते.

राज ठाकरे यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा आणि मनसेतर्फे राबवण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत त्यांनी स्वतः उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे, दिल्लीत विरोधी पक्षांची जी एकजूट आंदोलनात दिसत आहे, त्याबद्दलची सर्व माहिती संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना या भेटीदरम्यान दिली असावी. या भेटीत महाविकास आघाडीचे आंदोलन महाराष्ट्रात कसे पुढे न्यायचे, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Published on: Oct 15, 2026 01:07 PM

Follow Us