तामिळनाडूचा मिस्ट्री गोलंदाज, ज्याच्यावर पंजाबने साडे आठ कोटी उधळले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

जयपूर : आगामी आयपीएल मोसमासाठी सध्या जयपूरमध्ये लिलाव सुरु आहे. या लिलावात एका नावाने सध्या धुमाकूळ घातलाय. क्रिकेटविश्वात अज्ञात असणारा वरुण चक्रवर्ती हा तामिळनाडूचा खेळाडू सध्या सुरु असलेल्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यावर 8.40 कोटींची बोली लावत खरेदी केलं. वरुण चक्रवर्ती हा तामिळनाडूचा गोलंदाज आहे. यावर्षी हैदराबादविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याला यश […]

तामिळनाडूचा मिस्ट्री गोलंदाज, ज्याच्यावर पंजाबने साडे आठ कोटी उधळले
Follow us on

जयपूर : आगामी आयपीएल मोसमासाठी सध्या जयपूरमध्ये लिलाव सुरु आहे. या लिलावात एका नावाने सध्या धुमाकूळ घातलाय. क्रिकेटविश्वात अज्ञात असणारा वरुण चक्रवर्ती हा तामिळनाडूचा खेळाडू सध्या सुरु असलेल्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यावर 8.40 कोटींची बोली लावत खरेदी केलं.

वरुण चक्रवर्ती हा तामिळनाडूचा गोलंदाज आहे. यावर्षी हैदराबादविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याला यश मिळालं होतं. प्रथम श्रेणी सामन्यातील नऊ वडे मध्ये वरुण चक्रवर्तीच्या नावावर 22 विकेट आहेत. वयाच्या 13 व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळणं सुरु केलं होतं. चेन्नईतील एसआरएम विद्यापीठातून त्याने आर्किटेक्चरची डिग्री घेतली आहे.

अभ्यास पूर्ण केल्यानंतर वरुणने नोकरी सुरु केली. पण क्रिकेटची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यानंतर त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून एका क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यातच त्याला दुखापत झाली, ज्याच्यामुळे त्याला स्पिन गोलंदाजी करावी लागली आणि तो फिरकीपटू म्हणून ओळखला जाऊ लागला. वाचाआयपीएलमध्ये युवराज सिंहला अखेर खरेदीदार मिळाला!

आपल्या गोलंदाजीमध्ये सात प्रकारची कला असल्याचा दावा वरुण करतो. ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन, पाय आणि हातांवर यॉर्कर अशा प्रकारची गोलंदाजी तो करतो.

तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये वरुणने त्याचा संघ सिचम मदुराई पँथर्सला चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका निभावली होती. चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याने नेटवर गोलंदाजीही केलेली आहे. शिवाय कोलकाता नाईट रायडर्सनेही त्याला नेटवर गोलंदाजीसाठी बोलावलं होतं.

या निवडीनंतर वरुणचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आपला आनंद शब्दात सांगू शकत नसल्याचं तो म्हणाला. शिवाय पंजाबचा कर्णधार आर. अश्विनकडून बरंच काही शिकलो आहे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असं त्याने म्हटलंय.