
आजकाल सर्वजण सोशल मीडिया आणि मोबाईल फोनचा वापर करतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. सकाळपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारताचा दिग्गज क्रिकेट पटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसत आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसातच, स्टार क्रिकेटपटू विराट कोहली त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला. येथे त्यांनी प्रेमानंद यांचे आशीर्वाद घेतले. मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे प्रेमानंद महाराजांनी दिली.
आपण सोशल मीडियावर अनेकवेळा अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहातो. काही दिवसांपूर्वी कोहली दामपत्य उज्जैनमधील महाकालच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. चाहत्यांकडून दोघांनाही भरभरून प्रेम मिळत होते. सकाळपासून विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चला तर जाणून घेऊयात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमंक काय आहे.
कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. आता पुन्हा एकदा कोहली पत्नी अनुष्कासोबत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला. विराट आणि प्रेमानंद यांच्यात झालेला संवाद काहीसा असा आहे. प्रेमानंद महाराजांशी झालेल्या संभाषणात महाराजांनी विचारले, तुम्ही सर्वजण आनंदी आहात का? विराट कोहली म्हणाला हो गुरुजी. महाराज म्हणाले- देवाची कृपा कीर्ती किंवा वैभव वाढल्यामुळे होते असे मानले जात नाही, देवाची कृपा तेव्हाच मानली जाते जेव्हा आतून चिंतन होते. संत फक्त मार्ग दाखवू शकतात. नामाचा जास्त जप करण्याची गरज नाही. ते थोडेसे केले पाहिजे, पण ते खऱ्या भक्तीने केले पाहिजे.
विराट-अनुष्काने प्रेमानंद महाराजांसोबत घालवला वेळ…..
महाराजांनी कोहली आणि अनुष्काशी बराच वेळ गप्पा मारल्या. कोहली महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होता. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी दिसत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा श्री राधाकेलीकुंज आश्रमात सुमारे तीन तास राहिले. पण प्रेमानंद महाराजांशी त्यांची खाजगी चर्चा 15 मिनिटे चालली.
अनुष्काचा उज्जैन आणि कैचीधाम दौरा….
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2023 मध्ये, या जोडप्याने उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. तत्पूर्वी, दोघांनी उत्तराखंडमधील नीम करोली बाबा आश्रम, कैंची धाम येथे आध्यात्मिक सहल केली. विराट हा भगवान शिवाचा खूप मोठा भक्त आहे. त्याने आपल्या शरीरावर भगवान शिवाचे अनेक टॅटू देखील गोंदवले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्व क्रिकेट प्रेमींचा आवडता खेळाडू मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा यानी देखील कसोटी सामन्यातून निवृत्तीची घोषना त्याच्या सोशल मीडियावर केली या घटनेमुळे अनेक चाहत्यांचे मन दुख:वले आहेत. त्यानंतर लगेच 2 दिवसांमध्ये विरोट कोहलीने देखील कसोटीमधून निवृत्ती घेतली. या गोष्टीची घोषणा करताच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.