AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : राधे-राधे…, IPL चँपियन बनताच अनुष्कासह विराटने गाठलं वृंदावन, Photo

आरसीबीच्या आयपीएल विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माने वृंदावनला भेट दिली. त्यांनी आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले. साध्या वेशात आलेल्या या जोडप्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. आयपीएलपूर्वीही विराटने महाराजांचे दर्शन घेतले होते.

Virat Kohli : राधे-राधे..., IPL चँपियन बनताच अनुष्कासह विराटने गाठलं वृंदावन, Photo
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी घेतलं प्रेमानंद महाराजांचं दर्शन
| Updated on: Jun 02, 2026 | 3:25 PM
Share

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. रविवारी आयपीएल फायनलमध्ये विराटच्या शानदार खेळीने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिलं आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सर्व चाहत्यांसाठी हा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा क्षण होता. आरसीबीच्या खेळाडूंसह, त्यांचे कुटुंबीय, सर्वांनीच सेलिब्रेशन केलं. विराट- अनुष्काच्या डान्सचा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला. मात्र या सेलिब्रेशनचा, आनंदाचा भर ओसरल्यानंतर विराट आणि अनुष्का हे दोघेही पोहोचले वृंदावन येथे.  त्यांचे काही फोटो, तसेच व्हिडीओ देखील समोर आले असून पाहता पाहता ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले.

मंगळवारी विराट आणि अनुष्का या दोघांनीही आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या ‘राधा केली कुंज’ आश्रमाला भेट दिली. त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दोघेही अतिशय साध्या गेटअपमध्ये दिसत होते. डोळ्यांवर चश्मा, चेहऱ्यावर मास्क, साधा शर्ट-पँट अशा वेषात विराट तर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, डोक्यावर घेतलेली ओढणी आणि चेहऱ्यावर मास्क लावून, त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माही विराटसोबत चालत होती. दोघांनीही राधा केलि कुंज आश्रमात जाऊन प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतलं, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांचे आशीर्वाद घेतले. विराट आणि अनुष्का दोघेही प्रेमानंद महाराजांचे भक्त असून, अनेक वेळा ते वृंदावनमधील त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.

आयपीएलपूर्वीही विराटने घेतलं प्रेमानंद महाराजांचं दर्शन

यावेळी विराट एकदम सिंपल दिसत होता. त्याच्या हातात एक धार्मिक पुस्तक, कपाळावर टिळा लावलेला दिसत होता. अनुष्काही साध्या पंजाब ड्रेसमध्ये आश्रमात पोहोचली. विराट आणि अनुष्का यांनी यावेळी धार्मिक श्रद्धेनुसार दर्शन आणि पूजा केली. विशेष म्हणजे आयपीएल 2026 हा सीझन सुरू होण्यापूर्वी देखील विराट कोहलीने आश्रमात येऊन प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं होतं. आणि आता आरसीबीचा संघ आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर पुन्हा, लगेचच, त्याने आपले गुरू प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली.

आयपीएल विजयानंतर सेलिब्रेशन

रविवारी आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट आणि सर्वा खेळाडू भावूक झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, हाच आनंद दर्सवत होतं. गुजरात टायटन्सच्या 155 धावांचा पाठलाग करताना विराटने शानदार 75 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा बजावला. विजयानंतर संघातील खेळाडूंनी शानदार सेलिब्रेशन केलं. याशिवाय, एका व्हिडिओमध्ये विराट मनसोक्त डान्स करताना दिसला, अनुष्काने हसत हसत त्याचं शूटिंग केलं. हे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...