
विराट कोहलीला कर्णधार रोहित शर्मानं भारताचा बॅकअप सलामीवीर म्हणून संबोधलंय. तोच T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेत संघाचा सहावा किंवा सातवा गोलंदाजी पर्याय बनू शकतो. असं बोललं जातंय.

पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या नेट बॉलर्ससोबत चांगली 30 मिनिटे शेअर केली आहे. यात विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये दिसतोय. यात त्यांनी लिहिलंय की, “ये वाला अच्छा था, थोडा और आगे डालो, असं त्यांनी सहा-सात वेगवान गोलंदाजांना सल्ला दिलाय.

आशिया चषकात विराटनं त्याच्या कामगिरीची दाखवलेली जादू ही पुन्हा दाखवावी असं चाहत्यांना वाटतं. त्याच्याकडून चाहत्यांना जास्त आशा आहे.

मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I च्या पूर्वसंध्येला भारताच्या माजी कर्णधारानं नेटमध्ये जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या लहान चेंडूंचा सामना केल्यानंतर त्यानं अधिक वेळ गोलंदाजी केली. दरम्यान, विराटचे पंजाब क्रिकेट असोसिएशननं शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होतायत. याला चांगली लोकप्रियता देखील मिळतेय.