IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वनडेसाठी टीम इंडियाची खास तयारी, विराट कोहली बनला ‘कोच’, गिलसोबतचा Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. आता या मालिकेपूर्वी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वनडेसाठी टीम इंडियाची खास तयारी, विराट कोहली बनला कोच, गिलसोबतचा Video Viral
virat kohli and shubman gill
| Updated on: Jul 12, 2026 | 3:06 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली. जी भारतीय संघाने 4-0 ने गमावली. यानंतर अनेकांनी अनेक टीका केल्या. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यासाठी खेळाडूंनी सरावही सुरु केला आहे. टी-20 मालिकेत 4-0 असा निराशाजनक पराभव झाल्यानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह सराव करताना पाहायला मिळाले.  आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात विराट कोहली आणि शुभमन गिल दिसले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. संघातील काही खेळाडू साउथहॅम्प्टनमध्ये असल्याने, केवळ सात खेळाडू सराव करताना दिसले. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी जवळपास दोन तास एकत्र फलंदाजी केली. यापूर्वी, त्यांच्यात 30 मिनिटांचे संभाषणही झाले, ज्यामध्ये कोहली कर्णधाराला शॉट निवडण्याबाबत आणि इंग्लंडमधील परिस्थितीत गोलंदाजांचा सामना करण्याबाबत सल्ला देत असावा. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीचा सराव करताना दिसले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि गुरनूर ब्रार यांनी सर्व फलंदाजांना गोलंदाजी केली. भारतीय संघाने दोन फिरकी गोलंदाज आणि एका वेगवान गोलंदाजाचा समावेश असलेल्या नेट गोलंदाजांचीही मदत घेतली. विराट आणि रोहित चांगल्या लयीत दिसत होते. टीम इंडियाने सामन्यासारख्या परिस्थितीत सराव केला. बुमराह आणि ब्रार यांनी आपल्या लेंथने फलंदाजांची परीक्षा घेतली. कुलदीपने इंग्लंडमधील परिस्थितीचा अंदाज घेत गोलंदाजी केली. पहिला वनडे सामना 14 जुलै 2026 रोजी एडजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, शिवम दुबे

Follow Us