AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी आता थेट संघच बदलला

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात आता मोठा बदल केला जाईल. झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी हा बदल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

IND vs ZIM:  बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी आता थेट संघच बदलला
ravi bishnoi
| Updated on: Jul 12, 2026 | 1:20 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय मालिका नुकतीच संपली. ज्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. संघाने मालिका गमावली. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टी-20 मधील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाला वनडेमधील कामगिरी चांगली करावीच लागेल नाहीतर संघावर आणखी टीका होतील. आता भारतीय संघाने आधीच चांगली कामगिरी केलेली नाही यातच आता बीसीसीआय ऐनवेळी संघात मोठा बदल करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय लवकरच बदलेल्या संघाची अधिकृत घोषणा करेल.

आता टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती, ज्यात वरुणचा समावेश होता, पण आता असे वृत्त आहे की तो या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या स्टार फिरकीपटू रवी बिश्नोईला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले, पण त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. यामुळे तो पाचपैकी केवळ तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच सहभागी होऊ शकला. आता, काही वृत्तांनुसार, वरुण चक्रवर्ती झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे.

स्पोर्ट्सस्टारच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने वरुण चक्रवर्तीच्या जागी रवी बिश्नोईची निवड केली आहे. बिश्नोई इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याचा भाग होता, परंतु त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याचा समावेश नव्हता. मात्र, आता वरुण बाहेर गेल्याने, रवी बिश्नोई झिम्बाब्वेविरुद्धच्या भारतीय संघात असू शकतो. बीसीसीआयकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेला 23 जुलैपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकणे गरजेचे असणार आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार