AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध

मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध

| Updated on: Aug 26, 2026 | 9:53 PM
Share

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना एक मोठा झटका आहे. आंदोलनासाठी आझाद मैदानात फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आलीय. इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा घेण्यास बंदी घालण्यात आली. मनोज जरांगे आणि ओबीसी नेते मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची शक्यता असताना, मुंबईमध्ये आता आंदोलनाबाबत कठोर नियम लागू करण्यात आलेत. आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी […]

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना एक मोठा झटका आहे. आंदोलनासाठी आझाद मैदानात फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आलीय. इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा घेण्यास बंदी घालण्यात आली. मनोज जरांगे आणि ओबीसी नेते मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची शक्यता असताना, मुंबईमध्ये आता आंदोलनाबाबत कठोर नियम लागू करण्यात आलेत. आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागानं पूर्णपणे बंदी घातली आहे. तर आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवसासाठी आणि तीही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच परवानगी दिली जाणारे. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्यावरती मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून अंतरवालीमध्ये आंदोलन सुरु करणारे. सरकारने ऐकलं नाही तर मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाची पाहणीही केली आहे. दुसरीकडे 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये आंदोलन करणार असा इशारा ओबीसी नेत्यांनीही दिलाय. दोन्ही समाजाकडून आंदोलनाचा इशारा दिलेला असताना गृहविभागाने मुंबईमधील आंदोलनाबाबत नवे नियम लागू केलेत. मुंबईमध्ये फक्त आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असेल. आझाद मैदानावरही आंदोलनासाठी फक्त एक दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंतच परवानगी असेल. सहा वाजल्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलनाची मुभा असेल. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाहीये. मोर्चे आणि बेमुदत ठिय्या आंदोलनावर बंदी घालण्याचाही निर्णय आहे. आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांना परवानगी. आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमावं आणि तिथूनच निघून जावं. ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहने आणि प्राणी आणण्यास बंदी आहे. पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरला परवानगी नाही. नऊ बाय सहा फुटांपेक्षा मोठा बॅनर, झेंडा वापरण्यास मनाई असेल. झेंड्याची काठी दोन फुटांपेक्षा मोठी नको. आझाद मैदानात तंबू-मंडप उभारण्यास पूर्णपणे बंदी आहे.

Published on: Aug 26, 2026 09:53 PM

Follow Us