
IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंडमध्ये काल वडोदरा येथे पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. हा सामना सुरु असताना एक घटना घडली, त्यावर विराट कोहली नाराज आहे. विराटला सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट प्रेक्षकांचं हे वर्तन आवडलं नाही. विराटने त्या बद्दलच्या आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. सामान्यत: टीम इंडियाचा विकेट पडल्यानंतर स्टेडिअममध्ये सन्नाटा पसरतो. पण भारतीय मैदानांवर मागच्या काही काळापासून एक उलट दृश्य पहायला मिळतय. रविवारी वडोदऱ्याच्या बीसीए स्टेडिअममध्ये हेच झालं. 9 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आऊट झाला. विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरला. संपूर्ण स्टेडिअममध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता होती. फॅन्सना आपल्या टीमचा एक विकेट गेल्याचं दु:ख नव्हतं. जणू त्यांच्यासाठी सेलिब्रेशनची संधी होती.
सामना संपल्यानंतर प्रेजेंटेशन सोहळ्यावेळी विराट कोहली याबद्दल मोकळेपणाने बोलला. “मला चाहत्यांचं हे वर्तन आवडत नाही. प्रेक्षकांचा उत्साह समजू शकतो. पण जो खेळाडू आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असतो, त्याच्यासाठी हा चांगला अनुभव नसतो” असं विराट म्हणाला. “असचं वर्तन याआधी एमएस धोनी सोबत पहायला मिळालय. मी याकडे दुर्लक्ष करुन माझ्यावर खेळावर लक्ष देतो. फॅन्सकडून मिळणारं हे प्रेम कुठल्या आशिर्वादापेक्षा कमी नाहीय” हे सुद्धा विराट कोहली कबूल केलं. “आपला आवडीचा खेळ खेळून लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं यापेक्षा जास्त आनंददायी काय असू शकतं?. मी माझं स्वप्न जगतोय आणि लोकांना आनंदी पाहून आनंद होतो” असं विराट कोहली भावूक होत म्हणाला.
वर्तनाबद्दलच विराटने त्याचं मत मांडलं
रविवारी रोहित शर्माने टीमला चांगली सुरुवात करुन दिली. 29 चेंडूत 26 धावा करुन तो आऊट झाला. बाद होऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना स्टेडिअममध्ये एक सन्नाटा पसरला होता. रोहितनंतर कोहली फलंदाजीला येणार होता. कोहली लगेच पळत, पळत येतो. पण विराट रोहित आत जाईपर्यंत थांबला. त्यानंतर विराट मैदानावर येताच एकच आरडाओरडा सुरु झाला. उत्साहाने टाळ्या वाजल्या. क्राऊडच्या या वर्तनाबद्दलच विराटने त्याचं मत व्यक्त केलं.
वनडे सीरीजची विजयी सुरुवात
भारताने वनडे सीरीजची विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात चार विकेट राखून विजय मिळवला. विराट कोहलीचं शतक 7 धावांनी हुकलं. त्याने 93 धावांची खेळी केली. त्याने 8 चौकार आणि एक षटकार लगावला. 50 पेक्षा जास्त धावा करण्याची विराट कोहलीची सलग पाचवी वेळ आहे.