Virat Kohli : विराटकडून अशी अपेक्षा नव्हती, ज्यूनियर खेळाडूचा अपमान केला, म्हणाला हा तर…VIDEO

Virat Kohli : विराट कोहली एक लेजेंड मोठा खेळाडू आहे. त्याच विराटने मैदानावर स्वत:चा छोटेपणा दाखवून दिला. त्याने एक ज्यूनियर खेळाडूला अपमानित केलं. पंजाब किंग्स विरुद्धच्या कालच्या क्वालिफायर 1 च्या सामन्यातील ही घटना आहे.

Virat Kohli : विराटकडून अशी अपेक्षा नव्हती, ज्यूनियर खेळाडूचा अपमान केला, म्हणाला हा तर...VIDEO
Virak Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: May 30, 2025 | 10:32 AM

विराट कोहलीचा एक व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतोय. RCB विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा पहिला क्वालिफायर सामना झाला. त्या मॅचमधील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत विराट कोहली एका ज्यूनियर खेळाडूचा अपमान करताना दिसतोय. ‘हा पाणी घेऊन येणारा आहे’ असं विराट त्या प्लेयरबद्दल म्हणाला. आता प्रश्न आहे की, हा ज्यूनियर खेळाडू कोण आहे?, ज्याची किंग कोहलीने उडवली खिल्ली. त्याचं नाव आहे मुशीर खान.

20 वर्षाचा मुशीर खान पंजाब किंग्सचा हिस्सा आहे. त्याने क्वालिफायर 1 मॅचमधून आयपीएल डेब्यु केला. तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी जवळच फिल्डिंग करणारा विराट कोहली त्याला ‘हा पाणी घेऊन येणारा आहे’ असं म्हणाला.

कितव्या ओव्हरमधली घटना?

आयपीएल 2025 क्वालिफायर एकच्या सामन्यात पंजाबची इनिंग सुरु असताना 9 व्या षटकातील ही घटना आहे. त्यांचे 6 फलंदाज फक्त 60 धावात डगआऊटमध्ये परतले होते. त्यावेळी स्ट्राइकवर आलेल्या मुशीर खानला विराट कोहलीने टोमणा मारला. त्याची खिल्ली उडवली.


आपला छोटेपणा दाखवून दिला

37 वर्षाचा विराट कोहली मोठा लेजेंड आहे. त्याच्याकडून अशी अपेक्षा नाहीय. मुशीर खान प्रत्येक बाबतीत विराटला ज्यूनियर आहेच, पण तो विराटला भैय्या म्हणजे भाऊ बोलतो. अलीकडेच विराट कोहलीने मुशीर खानला एक बॅट दिली होती. ज्याबद्दल तो भरभरुन बोलला होता. आता विराटने अशी कृती करुन आपला छोटेपणा दाखवून दिला.