भारत-पाक सामना: कोहली म्हणतो, माझं उत्तर सोपं आहे, आम्ही देशाच्या बाजूनेच!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी होत आहे. त्यातच भारताने विश्वचषकात पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळू नये अशीही मागणी जोर धरत आहे. पण भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी मात्र त्याला विरोध केला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. विराट कोहलीने जो निर्णय […]

भारत-पाक सामना: कोहली म्हणतो, माझं उत्तर सोपं आहे, आम्ही देशाच्या बाजूनेच!
Follow us on

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी होत आहे. त्यातच भारताने विश्वचषकात पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळू नये अशीही मागणी जोर धरत आहे. पण भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी मात्र त्याला विरोध केला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

विराट कोहलीने जो निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि भारत सरकार जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असं सांगितलं.भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 16 जूनला मँचेस्टर इथं होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कोहलीला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना व्हावा की नाही, याबाबत विचारण्यात आलं.

त्यावर कोहली म्हणाला, “पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. देशाला जे हवं आहे त्याबाजूने आम्ही आहोत. बीसीसीआय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. सरकार आणि बोर्ड जो निर्णय घेईल, त्याचा आम्ही आदर करु”

पुलवामात जे काही घडलं ते सर्वांसाठी धक्कादायक होतं. जे झालं ते अत्यंत दु:खद आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही देशाच्या बाजूने आहोत, जे देशाला हवं आहे, जो निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकार घेईल, आम्ही त्याच बाजूने उभं राहू, असं विराट कोहली म्हणाला.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

पाकिस्तानशी खेळण्याबाबत अनेक माजी खेळाडूंनीही आपलं मत मांडलंय. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही जाहीरपणे त्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला मोफत दोन गुण देण्यापेक्षा त्यांच्याशी खेळा आणि धूळ चारा, असा पर्याय सचिनने सुचवलाय. पण देश जो निर्णय घेईल त्याला मनापासून पाठिंबा असेल, असंही त्याने म्हटलंय.

सुनील गावसकर यांची भूमिका

“विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. भारताने तो सामना खेळला नाही तर पाकिस्तानला फुकटचे 2 गुण जातील. त्यापेक्षा त्यांच्याविरोधात मॅच खेळून त्यांना हरवणं उत्तम”, असं सुनील गावसकर म्हणाले.

बीसीसीआयने निर्णय सरकारकडे सोपवला

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत काल पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळायला हवा का?
संबंधित बातम्या

विश्वचषकात पाकिस्तानशी खेळा आणि त्यांना धूळ चारा : सचिन  

पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा, खेळून हरवा: सुनील गावसकर