विश्वचषकात पाकिस्तानशी खेळा आणि त्यांना धूळ चारा : सचिन

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं …

विश्वचषकात पाकिस्तानशी खेळा आणि त्यांना धूळ चारा : सचिन

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानशी खेळण्याबाबत अनेक माजी खेळाडूंनीही आपलं मत मांडलंय. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही जाहीरपणे त्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला मोफत दोन गुण देण्यापेक्षा त्यांच्याशी खेळा आणि धूळ चारा, असा पर्याय सचिनने सुचवलाय. पण देश जो निर्णय घेईल त्याला मनापासून पाठिंबा असेल, असंही त्याने म्हटलंय.

“विश्वचषकात भारत पाकिस्तानवर नेहमीच वरचढ ठरलाय. आता पुन्हा एकदा त्यांना धूळ चारण्याची वेळ आहे. त्यांना विनाकारण दोन गुण द्यायला मला वैयक्तिकदृष्ट्याही आवडणार नाही. पण माझ्यासाठी माझा देश अगोदर आहे. त्यामुळे देश जो निर्णय घेईल मी त्या निर्णयाचं मनापासून समर्थन करेन, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.

खेळण्याबाबत निर्णय मोदी सरकार घेणार

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच क्रिकेट विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशीही मागणी पुढे आली. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 16 जूनला मँचेस्टर इथं होणार आहे. मात्र हा सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे.  त्यामुळे बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज बैठक घेतली.

सीओए प्रमुख विनोद राय यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.”सध्या आमची सरकारशी चर्चा सुरु आहे. 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही आयसीसीला दोन चिंता सांगू. पहिलं तर आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे जो देश दहशतवादाला चालना देत आहे त्या देशाशी क्रिकेटचे संबंध तोडावे”, असं विनोद राय यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *