वॉर्नर दाखवत होता मैदानात हुशारी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने उडवला त्रिफाळा, पाहा VIDEO

चुकीचा फटका मारण्याच्या नादात डेव्हीड वॉनरचा त्रिफाळा उडाला.

वॉर्नर दाखवत होता मैदानात हुशारी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने उडवला त्रिफाळा, पाहा VIDEO
david warner
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 04, 2022 | 5:18 PM

मेलबर्न : आज ऑस्ट्रेलिया (Australia) टीमसाठी एक महत्त्वाची मॅच सुरु आहे. आजच्या मॅचमध्ये मॅक्सवेलने (Glenn Maxwell) तुफानी खेळी करीत अर्धशतक केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमची धावसंख्या अफगाणिस्तानविरुद्ध 168 झाली आहे. ऑस्ट्रेलियातील इतर खेळाडूंना चांगली फलंदाजी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया टीमचा ओपनर फलंदाज डेव्हीड वॉर्नर (David Warner) याचा फॉर्म सध्या खराब सुरु आहे. त्यांच्याकडून अद्याप मोठी खेळी झालेली नाही.

आजच्या मॅचमध्ये आफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन-उल-हक हा ज्यावेळी गोलंदाजी करीत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया टीमचा ओपनर फलंदाज डेव्हीड वॉनर हा फलंदाजी करीत होता. चुकीचा फटका मारण्याच्या नादात डेव्हीड वॉनरचा त्रिफाळा उडाला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आजच्या मॅचसाठी ऑस्ट्रेलिया टीमने तीन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलिया टीम

कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड

अफगाणिस्तान टीम

प्लेइंग इलेव्हन रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), उस्मान घनी, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, दरवेश रसुली, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (सी), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी