AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत ज्या निर्णयाची वाट पाहात होता ते अखेर घडलेच, अमेरिकेतून मोठी आनंदाची बातमी, थेट आता रशियाकडून..

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढला असून मोठे युद्ध सुरू आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार आहे. यादरम्यानच आता अमेरिकेकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयातून भारताचा मोठा फायदा होणाप आहे.

भारत ज्या निर्णयाची वाट पाहात होता ते अखेर घडलेच, अमेरिकेतून मोठी आनंदाची बातमी, थेट आता रशियाकडून..
India Russia America
| Updated on: Mar 06, 2026 | 7:25 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला आहे. आज युद्धाला सात दिवस पूर्ण झाली. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला. युद्धाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत इराणच्या सर्वाेच्च नेत्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या सर्वाेच्च नेत्याचीही हत्या करण्यात आली. आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई याच्याकडे इराणची जबाबदारी असून इराणचा सर्वाेच्च नेत्या म्हणून घोषणा करण्यात आली. इराण त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट काळातून जात आहे. परिस्थिती अधिक तणावात आहे. मोज्तबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करताच इस्त्रायलकडून मोठी धमकी देत सांगण्यात आले की, आम्ही इराणच्या सर्वाेच्च नेत्यालाही ठार करू. यादरम्यानच अमेरिकेने भारतातून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला केला आणि त्यामधील 87 सैनिकांचा मृत्यु झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. सध्या परिस्थिती अधिक बिघडल्याचे बघायला मिळत आहे.

इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान महत्वाचा समुद्री मार्ग बंद केला, ज्याने खळबळ उडाली. भारतात इराणचा समुद्री मार्ग स्टेट ऑफ होर्मुजच्या माध्यमातून मोठ्य संख्येने तेल येते, तोच मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. ज्यामुळे भारतात होणाऱ्या तेल पुरवठा आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला.

मागील काही वर्षांपासून भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. मात्र, रशियाकडून तेल खरेदीबाबत अनेक निर्बंध भारतावर अमेरिकेने लादली आहेत. तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने भारताने थेट रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे याला थेट अमेरिकेनेही मान्यता दिली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, असे स्पष्ट शब्दात अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, ही सूट फक्त 30 दिवसांकरिता दिली आहे. सध्या इराणने त्यांचा समुद्री मार्ग बंद केल्याने सर्व तेलाचे आणि गॅसचे टॅंकर अडकून पडले असून मोठा जाम लागला आहे.

यावर बोलताना अमेरिकी सरकारची मंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, ग्लोबल मार्केटमध्ये तेलाची निर्यात आणि आयात सुरू ठेवण्याकरिता भारतीय रिफायनर्सला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी आम्ही दिली. ही परवानगी पुढील 30 दिवसांकरिता असेल. सध्या समुद्रमार्गात जी स्थिती निर्माण झाली, त्यानंतर हा निर्णय आम्ही घेतली. यातून रशियाला फार काही फायदा होणार नाहीये. हे अत्यंत कमी कालावधीकरिता असल्याने त्यांना फायदा होणार नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...