Wasim Akram: “तो माझ्याशी एका नोकरासारखा वागावायचा….” वसीम अक्रमचा पुस्तकातून मोठा खुलासा

वसिम आक्रमला हा खेळाडू मसाज करायला सांगायचा, पुस्तकातून खळबळजनक दावा

Wasim Akram: तो माझ्याशी एका नोकरासारखा वागावायचा.... वसीम अक्रमचा पुस्तकातून मोठा खुलासा
Wasim AKram
Image Credit source: AFP
| Updated on: Nov 29, 2022 | 8:44 AM

मुंबई : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वसीम आक्रम (Wasim Akram) हा त्यांच्या चांगल्या खेळीमुळे अधिक चर्चेत असायचा. त्याच्या नावावर सुद्धा त्याने अनेक रेकॉर्ड (Record) केले आहेत. एक हाती सामना जिंकून द्यायची ताकद वसिम आक्रमच्या गोलंदाजीत होती. विशेष म्हणजे त्याच्या हेअर स्टाईलमुळे (Hair Style) तो अधिक चर्चेत होता. त्याच्या पुस्तकात त्याने एक नवा खुलासा केला. तो म्हणतोय की, “पाकिस्तानचा एक खेळाडू त्याच्याशी नोकरा सारखा वागत होता.” त्यामुळे त्यांच्या पुस्तकाची क्रिकेट विश्वात सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू सलिम मलिक या खेळाडूवरती आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वसिम आक्रमचं पुस्तकं वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या चाहत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सुल्तान: ए मेमॉयर’ या पुस्तकातं आक्रमने सलिम मलिक याच्यावरती जोरदार आरोप केले आहेत.

ज्यावेळी पाकिस्तानच्या टीममध्ये वसिम आक्रमला संधी मिळाली. त्यावेळी सलिम मलिक हा सिनिअर खेळाडू होता. तो नव्या खेळाडूंना एखाद्या नोकरा सारखा वागवत होता.

त्यावेळच्या टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मी जुनिअर खेळाडू असल्याचा गैरफायदा मलिक घेत होता. टीममध्ये त्यावेळी तो नकारार्थी आणि स्वार्थी खेळाडू होता असा आरोप पुस्तकात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मलिक त्यावेळी शरीराची मसाज करायला लावायचा, त्याने कपडे आणि शूज सुद्धा स्वच्छ करायला सांगितल्याचं आक्रमने पुस्तकात म्हटलं आहे. ज्यावेळी आक्रमला या गोष्टीचं वाईट वाटलं, त्यावेळी त्याला रमीझ, ताहिर, मोहसीन, शोएब मोहम्मद या खेळाडूंनी नाईट क्लबमध्ये आमंत्रण दिलं होतं.