
भारतामध्ये झालेला 2016 चा विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला होता. शेवटच्या षटकात कार्लोस ब्रॅथवेटने गगनचुंबी चार षटकार मारुन इंग्लंडला धूळ चारली होती. ब्रॅथवेटच्या कामगिरीने वेस्ट इंडिजने दुसरा विश्चचषक जिंकला. तेव्हापासून, संपूर्ण जगभरात ब्रॅथवेटचा डंका वाजला. दोनच वर्षांनंतर तो लग्नबंधनात अडकला. पण त्याची खास लव्ह स्टोरी आहे. त्याची सहा वर्षांपासून असलेली मैत्रीण जेसिका फेलिक्ससोबत त्याने लग्न केलं.

जेसिका व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे तर कार्लोस क्रिकेटर.... लग्नाआधी दोघांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केलं.

जेसिका आणि कार्लोस कोणत्या पार्टी किंवा कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले नाहीत. तर या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली. जेसिकाने 12 एप्रिल 2017 रोजी डेक्कन हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.

कार्लोस मला सतत सोशल मीडियावर मेसेज करायचं. तिथे आमची ओळख झाली. पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मला त्यावेळी कार्लोसबद्दल फारसं माहिती नव्हतं. तो क्रिकेटर आहे म्हणून मी त्याला पसंत केलं नाही तर त्याहून अधिक तो चांगला माणूस आहे, म्हणून मी त्याला पसंत केलं, असं जेसिकाने एका मुलाखतीत सांगितलं.

जेसिका आणि कार्लोसचं लग्न जेसिकाच्या वाढदिवशी झालं होतं. ती तारीख 18 मार्च 2017. म्हणजेच वर्ल्डकप जिंकल्यानंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली.