IND vs WI : तिसऱ्या वनडेतून हा स्टार प्लेयर OUT, पहिल्या मॅचमध्ये ठोकलेलं दमदार शतक
IND vs WI 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज तिसरा वनडे सामना होणार आहे. न्यू चंदीगडच्या मुल्लांपुर येथे ही मॅच आहे. या सामन्याआधी धक्का बसला आहे. स्टार खेळाडू आऊट झाला.

IND vs WI 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु आहे. या सीरीजमध्ये भारताने आधीच 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज 3 ऑक्टोंबरला न्यू चंदीगडच्या मुल्लांपुर येथे तिसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्याआधी वेस्ट इंडिजला धक्का बसला आहे. टीमचा स्टार खेळाडू प्लेइंग इलेवनमधून आऊट झालाय. या खेळाडूने सीरीजच्या पहिल्या मॅचमध्येच शतकी खेळी केली होती. पण दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे तो मैदानात उतरु शकला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार वेस्ट इंडिजचा फॉर्ममध्ये असलेला 32 वर्षांचा स्टार ऑलराऊंजर जस्टिन ग्रीव्स अजून पर्यंत आपल्या काल्फच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. तो तिसऱ्या वनडेमधून बाहेर गेलाय. सामन्याच्या आदल्यारात्री ग्रीव्स तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याच समोर आलं. त्यामुळे पाहुण्या वेस्ट इंडिजच्या टीमला धक्का बसला आहे. जस्टिन ग्रीव्सने पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजसाठी दमदार फलंदाजी केली होती. तिसऱ्या वनडेत त्याचं न खेळणं हा त्यांच्या टीमसाठी धक्का आहे.
भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलेलं
तिरुवनंतपुरम येथील पहिल्या वनडे सामन्यात त्याने शानदार शतक झळकावलं होतं. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना वर्चस्व गाजवता आलं नाही. ते बॅकफूटवर गेले. मात्र त्याच सामन्यात त्याला काल्फचा त्रास झाला. त्यामुळे तो गुवहाटीच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही खेळू शकला नाही. दुसऱ्या वनडेत त्याच्याजागी टीममध्ये समावेश करण्यात आलेला केसी कार्टी विशेष प्रभाव पाडू शकला नाही. फक्त 10 चेंडूत 9 धावा करुन आऊट झाला.
स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एक संधी
मेडिकल टीमने ग्रीव्सच्या दुखापतीची तपासणी केली. त्यातून तो अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याचं स्पष्ट झालं. परिणामी टीम मॅनेजमेंटने त्याला तिसऱ्या वनडेत न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्टीला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. कार्टीकडे स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एक संधी आहे.
सर्वांना वाटलेलं की भारताला जमणार नाही
दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 406 धावांचं लक्ष्य ठेवलेलं. सर्वांना वाटलेलं की भारताला जमणार नाही. पण भारतीय फलंदाजांनी कमाल केली. हे डोंगराएवढ लक्ष्य पार करुन इतिहास रचला. कॅप्टन शुबमन गिलने द्विशतकी खेळी केली.