भारत की पाकिस्तान, सानियाच्या बाळाला नागरिकत्व कोणतं?

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

हैदराबाद: भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. मंगळवारी 30 ऑक्टोबरला सानियाने गोंडस बाळाला जन्म दिला. खुद्द शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांना ट्विटरवरुन दिली. हैदराबादेतील एका खासगी रुग्णालयात सानियाने बाळाला जन्म दिला. त्याबाबत माहिती देताना शोएब म्हणतो, “आनंद गगनात मावेना. सानियाने बाळाला जन्म दिला. गोंडस मुलगा आहे. […]

भारत की पाकिस्तान, सानियाच्या बाळाला नागरिकत्व कोणतं?
Follow us on

हैदराबाद: भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. मंगळवारी 30 ऑक्टोबरला सानियाने गोंडस बाळाला जन्म दिला. खुद्द शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांना ट्विटरवरुन दिली. हैदराबादेतील एका खासगी रुग्णालयात सानियाने बाळाला जन्म दिला. त्याबाबत माहिती देताना शोएब म्हणतो, “आनंद गगनात मावेना. सानियाने बाळाला जन्म दिला. गोंडस मुलगा आहे. बाळ आणि बाळाची आई सुखरुप आहे. शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार”

शोएबने या ट्विटसोबत #BabyMirzaMalik असा हॅशटॅग वापरला आहे. बाळाच्या नावात मिर्झा मलिक असेल असं शोएब-सानियाने यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळेच शोएबने आपल्या ट्विटसोबत #BabyMirzaMalik असा हॅशटॅग वापरला आहे.

बाळाला कोणतं नागरिकत्व?

शोएबच्या या ट्विटनंतर बाळाच्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. मात्र सानियाने बाळाचं जन्म ठिकाण हैदराबाद निवडलं होतं, त्यावरुन बाळाच्या नागरिकत्वबाबत आधीपासूनच विचार केला असावा.

सानियाचा पती शोएब मलिक पाकिस्तानी क्रिकेटर आहे. साहजिकच तो पाकिस्तानी नागरिक आहे. मात्र भारतीय टेनिसस्टार सानियाने शोएबसोबतच्या लग्नानंतरही पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारलं नाही. हे दोघेही दुबईत राहतात. सानियाने माहेरी म्हणजे हैदराबादला बाळाला जन्म दिला, त्यामुळे नागरिकत्व पाकिस्तानी नाही तर भारताचं असेल.

गरोदरपणात सानिया माहेरी म्हणजे हैदराबादेत होती. साधारणत: मुलीचं बाळंतपण माहेरी करण्याची प्रथा भारतात आहे. मात्र शोएब पाकिस्तानी, सानिया भारतीय आणि दोघे राहतात दुबईत, त्यामुळे सानियाची डिलिव्हरी कुठे होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. पण सानिया माहेरी आल्याने त्याला पूर्णविराम मिळाला होता.

शोएब आणि सानियाने दुबईत घर विकत घेतलं आहे. दोघेही स्पर्धांच्या निमित्ताने बाहेर असतात, मात्र जेव्हा स्पर्धा नसतात तेव्हा दोघे याच घरात राहणं पसंत करतात.

सानिया आणि शोएब यांच्या लग्नाला आठ वर्ष उलटली आहेत, मात्र दोघांनीही आपल्या खेळावरील लक्ष विचलित होऊ दिलं नाही.

भारत सरकारचं नागरिकत्व धोरण

सानियाने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हैदराबादमध्येच बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. भारत सरकारच्या नागरिकत्व धोरणानुसार, जर आई-वडिलांपैकी एकजण भारतीय असेल आणि त्यांच्या  बाळाचा जन्म भारतात झाला तर बाळाला भारतीय नागरिकत्व अधिकार आहे.

भारत आणि दुबईत सानियाचं वास्तव्य

सानिया मिर्झा आपला अधिकाधिक काळ भारत किंवा दुबईत घालवते. ती सासरी म्हणजेच पाकिस्तानला खूप कमी वेळा जाते.