
मुंबई : टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) मॅचची सगळ्या चाहत्यांना आतुरता लागली होती. टीम इंडिया जिंकल्यानंतर अनेकांनी फटाक्यांची दिवाळी दुपारी साजरी केली. टीम इंडियाच्या जगभरातील चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. भारतात काल अनेक ठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन घोषणा दिल्या, तसेच टीम इंडिया विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकणार असल्याचं जाहीर केलं.
काल प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात विराट कोहलीने चांगली बॅटिंग केली. त्यामुळे कालपासून विराट कोहलीचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. कालची मॅच अंतिम ओव्हरपर्यंत चालली. त्यामध्ये विराट कोहलीने मोठी भागीदारी केली.
कालच्या सामन्यात पाकिस्तान खेळाडूंकडून अनेक चुका झाल्यामुळे त्याचा पराभव झाला. रोमांचक झालेल्या सामन्यात कोणाचा विजय होईल असं वाटतं होतं. परंतु आर. आश्विन या खेळाडूने शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन टीमला विजय मिळवून दिला.
ज्यावेळी काल मॅच सुरु होती. त्यावेळी अनु्ष्का शर्मा आणि तिची मुलगी मॅच पाहत होती. विराट कोहली ज्यावेळी चांगले शॉट मारत होता. त्यावेळी ती डान्स करीत असल्याचे अनुष्काने इंन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे.