VIDEO : विश्वचषक ट्रॉफीसाठी वापरलेली गाडी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

विश्वविजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी चक्क निसान मोटार्स कंपनीने एक अर्धवट कापलेली एका विशेष गाडी तयार केली होती. ही गाडी पाहून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

VIDEO : विश्वचषक ट्रॉफीसाठी वापरलेली गाडी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
| Updated on: Jul 16, 2019 | 8:22 AM

लंडन : विश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पहिल्यांदा विश्वचषक विजेतेपदासाठी खेळत असल्याने हा सामना ऐतिहासिक सामन्यांपैकी एक होता. मात्र ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला. विशेष म्हणजे लॉर्ड्सचे मैदानही या सामन्याचा ऐतिहासिक साक्षीदार ठरला. पण इंग्लंडला देण्यात आलेल्या विश्वविजेतेपदाची ट्रॉफी आयसीसी किंवा कोणी माजी खेळाडूने ही ट्रॉफी मैदानात आणली असावी असे अनेकांना वाटले असेल, मात्र असे अजिबात नाही. विश्वविजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी चक्क निसान मोटार्स कंपनीने एक अर्धवट कापलेली एका विशेष गाडी तयार केली होती. ही गाडी पाहून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

लॉर्डसच्या मैदानात विश्वचषकाच्या ट्रॉफी आणलेली गाडी अर्धवट कापलेली होती. आयसीसीच्या प्रमुख स्पॉन्सर निसान मोर्टस कंपनीने ही गाडी तयार केली होती. ‘निसानची नव्या मॉडेलची गाडी आणि त्यात चमचमती ऐतिहासिक विश्वचषकाची ट्रॉफी’ असे मनमोहक दृष्य इंग्लंडच्या रस्त्यांपासून लॉर्डसच्या मैदानापर्यंत अनेकांना दिसले.

 

या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी अर्धवट कापलेली होती. निसान Half LEAF असे या गाडीचे नाव आहे. निसानने अशाप्रकारे गाडी तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अशा पद्धतीची अनोखी गाडी पाहून क्रिकेट प्रेमींसह चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या.

 

निसानच्या इंडियाने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार,  “क्रिकेट विश्वचषकाचा समारोप एखाद्या नवीन आणि ऐतिहासिक पद्धतीने करुया. निसानची नवी Half LEAF गाडी आणि त्यात चमकणारी वर्ल्डकपची ट्रॉफी असे ट्विट निसानच्या इंडियाने केले आहे.” तसेच त्यांनी या गाडीचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे अशा पद्धतीने पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात विश्वचषकाची ट्रॉफी आणली असावी असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात थरारक सामन्यांपैकी एक सामना रविवारी (14 जुलै) इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने इंग्लंडसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लंडला जिंकण्यासाठी शेवटच्या एका चेंडूत दोन धावांची गरज होती. पण, दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज मार्क वूड धावबाद झाला. त्यामुळे सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये हा सामना खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.