WPL 2026 Full Schedule : महिला प्रीमियर लीगच्या संपूर्ण शेड्यूलची घोषणा, पहिल्या मॅचपासून ते फायनलपर्यंत सर्व डिटेल घ्या जाणून

WPL 2026 Full Schedule : महिला प्रीमियर लीग शेड्यूलची घोषणा झाली आहे. 28 दिवस चालणाऱ्या या WPL च्या सीजनमध्ये एकूण 22 सामने खेळले जातील. मॅच संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरु होतील.

WPL 2026 Full Schedule : महिला प्रीमियर लीगच्या संपूर्ण शेड्यूलची घोषणा, पहिल्या मॅचपासून ते फायनलपर्यंत सर्व डिटेल घ्या जाणून
WPL 2026 Full Schedule
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 29, 2025 | 1:34 PM

WPL 2026 Schedule: बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग मेगा ऑक्शननंतर आता या टुर्नामेंटच्या फुल शेड्यूलची घोषणा केली आहे. या टुर्नामेंटच्या शेड्यूलने सर्वांना धक्का दिलाय. कारण एवढ्या मोठ्या लीगची फायनल सुट्टीच्या दिवशी होणार नाही, हे पहिल्यांदा होणार आहे. बीसीसीआयने जे शेड्यूल जारी केलय, त्यानुसार टूर्नामेंटचा एलिमिनेटर आणि फायनल सामना वीक-डे ला होईल. एलिमिनेटर सामना 3 फेब्रुवारीला आहे. त्या दिवशी मंगळवार आहे. फायनल मॅच 5 फेब्रुवारीला आहे, त्यादिवशी गुरुवार आहे. यावेळी टुर्नामेंट फक्त नवी मुंबई आणि वडोदरा येथे होईल.

28 दिवस चालणाऱ्या या WPL च्या सीजनमध्ये एकूण 22 सामने खेळले जातील. दोन डबल हेडर सामने सोडल्यास सर्व मॅच संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरु होतील. नवी मुंबईच्या डीवाय पाटिल स्टेडियमवर सुरुवातीचे सामने आणि दोन डबल-हेडर मॅच होतील. त्यानंतर टूर्नामेंटचा दुसरा भाग वडोदरा येथे होईल. वडोदरा येथेच प्लेऑफ आणि फायनल मॅच होईल.

WPL 2026 चं पूर्ण शेड्युल

9 जानेवारी– मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, नवी मुंबई

10 जानेवारी- यूपी वॉरियर्स vs गुजरात जायंट्स, नवी मुंबई

10 जानेवारी- मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई

11 जानेवरी- दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात जायंट्स, नवी मुंबई

12 जानेवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु vs यूपी वॉरियर्स, नवी मुंबई

13 जानेवारी- मुंबई इंडियन्स vs गुजरात जायंट्स, नवी मुंबई

14 जानेवारी- यूपी वॉरियर्स vs दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई

15 जानेवारी- मुंबई इंडियन्स vs यूपी वॉरियर्स, नवी मुंबई

16 जानेवारी- रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु vs गुजरात जायंट्स, नवी मुंबई

17 जानेवारी- यूपी वॉरियर्स vs मुंबई इंडियन्स, नवी मुंबई

17 जानेवारी- दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, नवी मुंबई

19 जानेवारी- गुजरात जायंट्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु,वडोदरा

20 जानेवारी- दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स, वडोदरा

22 जानेवारी- गुजरात जायंट्स vs यूपी वॉरियर्स, वडोदरा

24 जानेवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु vs दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा

26 जानेवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु vs मुंबई इंडियंस, वडोदरा

27 जानेवारी- गुजरात जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा

29 जानेवारी- यूपी वॉरियर्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, वडोदरा

30 जानेवारी- गुजरात जायंट्स vs मुंबई इंडियन्स, वडोदरा

1 फेब्रुवारी – दिल्ली कॅपिटल्स vs यूपी वॉरियर्स, वडोदरा

3 फेब्रुवारी- एलिमिनेटर, वडोदरा

5 फेब्रुवारी- फायनल, वडोदरा