The Great Khali | ‘द ग्रेट खली’ला मातृशोक, पंजाबमध्ये टांडी देवी यांचे निधन

| Updated on: Jun 21, 2021 | 2:35 PM

गेल्या दोन वर्षांपासून खलीच्या आईला श्वसनासंबंधी त्रास जाणवत होता. सुरुवातीला जालंधरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले

The Great Khali | द ग्रेट खलीला मातृशोक, पंजाबमध्ये टांडी देवी यांचे निधन
The Great Khali and Mother Tandi Devi
Follow us on

नवी दिल्ली : ‘डब्ल्यूडब्ल्यूई’चा माजी चॅम्पियन (WWE wrestler) ‘द ग्रेट खली’ (The Great Khali) याला मातृशोक झाला. खलीच्या मातोश्री तांदी देवी (Tandi Devi) यांचे पंजाबमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अवयव निकामी झाल्यामुळे टांडी देवी यांची प्राणज्योत मालवली. लुधियानातील दयानंद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या 75 वर्षांच्या होत्या. (Wrestler Great Khali’s mother Tandi Devi dies due to multiple organ failure in Ludhiana)

दोन वर्षांपासून श्वसनासंबंधी त्रास

कुस्तीपटू खलीच्या आई यांचे अवयव निकामी झाल्यामुळे लुधियानातील डीएमसी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, असे परिपत्रक रुग्णालयातर्फे जारी करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून खलीच्या आईला श्वसनासंबंधी त्रास जाणवत होता. सुरुवातीला जालंधरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

हिमाचल प्रदेशातील मूळगावी अंत्यसंस्कार

गेल्या आठवड्यात टांडी देवी यांना लुधियानामध्ये हलवण्यात आले. गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिमाचल प्रदेशातील सिरमूर जिल्ह्यातील खलीचे मूळगाव धिरैनामध्ये सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘द ग्रेट खली’ची ओळख

‘द ग्रेट खली’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या जगविख्यात कुस्तीपटूचे मूळ नाव दिलीप सिंग राणा. 2000 मध्ये त्याने व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून पदार्पण केले. पंजाब पोलिसातही त्याने कामगिरी बजावली आहे. 2006 ते 2014 मध्ये तो ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये खेळत होता. तो चार हॉलिवूड, तर दोन बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकला आहे.

सोशल मीडियावर ट्रोलिंग

खली सोशल मीडियवर कमालीचा सक्रिय असल्याचे कायम दिसून येते. मात्र नुकतंच त्याला ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. इन्स्टाग्राम युजर्स विविध प्रकारच्या मजेशीर मागण्या करत होते. तसेच खलीचे विविध मीम्सही व्हायरल करुन त्याला ट्रोल केलं जात होतं. या सर्व ट्रोलिंगला वैतागून खलीने आपल्या सोशल मीडियवरील पोस्टना असणारे कमेंट सेक्शनच बंद करुन टाकले होते.

हेही वाचा :

फॅन्सच्या ट्रोलिंगने वैतागला The Great Khali, उचललं ‘हे’ पाऊल

VIDEO : कच्च्या रस्त्यावर द ग्रेट खलीची बुलेट रायडिंग, व्हिडीओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

(Wrestler Great Khali’s mother Tandi Devi dies due to multiple organ failure in Ludhiana)