VIDEO : कच्च्या रस्त्यावर द ग्रेट खलीची बुलेट रायडिंग, व्हिडीओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

The Great Khali Ride bullet

VIDEO : कच्च्या रस्त्यावर द ग्रेट खलीची बुलेट रायडिंग, व्हिडीओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
चेतन पाटील

|

Jan 30, 2021 | 4:01 PM

मुंबई : WWE च्या माध्यमातून संपूर्ण जगात नावलौकिक कमवणारा द ग्रेट खली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो रेसलिंगसाठी चर्चत आलेला नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओत खली एका कच्च्या रस्त्यावरुन बुलेट गाडी चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खलीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे (The Great Khali Ride bullet).

द ग्रेट खली WWE च्या माध्यमातून संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही खली दिसला आहे. खलीचे फक्त भारतातच नाही तर जगभरात विविध देशांमध्ये चाहते आहेत (The Great Khali Ride bullet).

खली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत खली बुलेट चालवताना दिसत आहे. सुरुवातीला खली बुलेटवर बसतो. त्यानंतर जॅकेट डोक्यावर चढवतो आणि मग गाडी चालू करतो.

खलीची उंची सात फूटापर्यंत आहे. त्यामुळे खलीसमोर ही बुलेट अगदीच एखाद्या खेळण्यासारखी वाटत आहे. खलीचे पाय लांब असल्यामुळे तो बुलेटवर वेगळ्या अंदाजात बसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना तो व्हिडीओ आवडत आहे. अनेक चाहते व्हिडीओवर कमेंटही करत आहेत.

हेही वाचा : सहा महिन्यांचं राशन सोबत घेऊन आलोय, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही : द ग्रेट खली

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें