Tokyo Olympics | पैलवान रवी दहिया फायनलमध्ये; रौप्य पदक पक्कं, सुवर्णपदकाची संधी

| Updated on: Aug 04, 2021 | 4:04 PM

भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे. (wrestler Ravi Dahiya Wins Silver Medal at Tokyo Olympic 2021) त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. आता फायनलमध्ये रवीकडे […]

Tokyo Olympics | पैलवान रवी दहिया फायनलमध्ये; रौप्य पदक पक्कं, सुवर्णपदकाची संधी
कुस्तीपटू रवि दहिया
Follow us on

भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे. (wrestler Ravi Dahiya Wins Silver Medal at Tokyo Olympic 2021) त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. आता फायनलमध्ये रवीकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

शेवटच्या 50 सेकंदांचा खेळ

टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो वजनी गटात रवी कुमार दहियाचा सामना कझाकिस्तानच्या नूरिसलामसोबत होता. दोनघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये 6-6 मिनीटांचे दोन राऊंड झाले. पहिल्या राऊंडमध्ये लीड बनवण्याच्या प्रयत्नात रवीकुमार नूरिसलामच्या डावपेचात अडकला. त्याचा परिणाम म्हणून रवी 7 पॉईंट्सने पिछाडीवर गेला. मात्र, हान न मानता रवीने शेवटच्या 50 सेकंदांमध्ये नूरिसलामचा चितपट केलं आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. यासोबतच त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे. आता फायनलमध्ये रवीकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

सुशीलकुमारनंतर कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवणारा रवी दुसरा भारतीय आहे. याआधी सुशीलकुमारने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. याशिवाय योगेश्वर दत्त (2012) आणि साक्षी मलिक (2016) यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.

संबंधित बातम्या :

Tokyo Olympics | पैलवान रवी दहिया फायनलमध्ये; रौप्य पदक पक्कं, सुवर्णपदकाची संधी

Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

Tokyo Olympics 2021: ऑलिम्पिकमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान, दोन धुरंधर आमने-सामने, असा असेल सामना