Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 04, 2021 | 11:48 AM

अटीतटीच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताच्या लवलिनाला पराभव पत्करावा लागला. मात्र आधीच धडाकेबाज कामगिरी करत सेमीफायनल गाठणाऱ्या लवलीनाला बॉक्सिंग नियमांनुसार कांस्य पदक मिळाले आहे.

Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव
लवलीना बोरगोहेन

Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या सोबतच तिने किमान कांस्य पदक पक्क केलं होत. मात्र आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीला (Busenaz Surmeneli) नमवून आपल्या पदकाचा रंग बदल्याण्याची संधी लवलीनाकडे होती. पण अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेलीने लवलीनाला 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली.

भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातलं आहे.

असा झाला सामना

सामन्यात दोन्ही बॉक्सरनी उत्तम खेळ दाखवला. पण टर्कीच्या सुरमेनेलीने चपळ खेळ दाखवत सुरुवातीपासून सामन्यावर दबदबा कायम ठेवला. त्यामुळे तिचे पंचेसही लवलीनाला थेट लागले. अचूक टार्गेट गाठत तिने अधिक गुण मिळवले. त्यामुळे तिन्ही राउंडमध्ये तिने जजेसची मनं जिंकत सामना 5-0 ने आपल्या नावे केला.

लवलीनाचा 10 वा पराभव

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या 23 वर्षीय लवलीनाचा हा 10 वा पराभव होता. तिने आतपर्यत  14सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे  सेमीफायनल जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या टर्कीच्या बुसानाजचा हा 26 वा विजय होता तिने केवळ 6 सामने गमावले आहेत.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: भारतीय हॉकी संघाला कांस्य पदकाची आशा, असे असेल आव्हान

Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले…

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

(india boxer lovlina borgohain won Bronze medal at womens welterweight category after losing in semifinal)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI