Maharashtra News LIVE : खासदार धैर्यशील माने-आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या चालकांमध्ये ‘दे दणादण’
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 27 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

नवी दिल्लीत आज नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र कसे बनवले जाऊ शकते, यावर चर्चा होणार आहे. या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पूर आला आहे. यामुळे अनेक वाहतूक मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र पार पडत आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांचा नीती आयोगावर निशाणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर काँग्रेस खासदार राजीव शुक्ला म्हणाले की, प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे ऐकले पाहीजे, विशेषत: विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचं.. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहीजेत आणि सरकारला ते ऐकायचे नसेल, तर नीती आयोगाने याकडे लक्ष दिले पाहिजे…ममता बॅनर्जी यांच्यासोबत जे झाले ते योग्य नाही…नीती आयोग निःपक्षपाती असणे आवश्यक आहे.
-
ममता बॅनर्जी यांचे आरोप अर्थमंत्री सीतारमण यांनी फेटाळून लावले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीला हजर होत्या. आम्ही सर्वांनी त्यांचे ऐकले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना वेळ देण्यात आला आणि तो स्क्रीनवर प्रदर्शित झाला. त्यांनी मीडियाला सांगितले की त्यांचा माईक बंद केला होता हे संपूर्ण खोटे आहे.’
#WATCH पश्चिम बंगाल की सीएम ममता बनर्जी के आरोपों पर केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा, “सीएम ममता बनर्जी ने नीति आयोग की बैठक में हिस्सा लिया। हम सभी ने उन्हें सुना। प्रत्येक सीएम को आवंटित समय दिया गया था और उसे स्क्रीन पर प्रदर्शित किया गया था जो हर टेबल के सामने… pic.twitter.com/I0F2gkXUIs
— ANI_HindiNews (@AHindinews) July 27, 2024
-
-
तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भाजपा कार्यालयात हजेरी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यालयात हजेरी लावली.
#WATCH दिल्ली: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा और उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी भाजपा मुख्यालय पहुंचे। pic.twitter.com/MWoHmaG1R5
— ANI_HindiNews (@AHindinews) July 27, 2024
-
चंद्राबाबू नायडूंना 20 मिनिटे आणि मला फक्त 5 मिनिटे बोलायली दिली : मुख्यमंत्री ममता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नीती आयोगाच्या बैठकीत 20 मिनिटे बोलले. आसाम, अरुणाचल, छत्तीसगड आणि गोव्याचे मुख्यमंत्रीही 15-20 मिनिटे बोलले. पण मला फक्त 5 मिनिटे बोलायची संधी दिली. बेल वाजवून मला थांबवले, मी म्हणाले ठीक आहे तुम्हाला बंगालचं ऐकायचे नसेल तर ठीक आहे. मी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि निघून गेले.’
-
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच दोघांची एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण
खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. पालकमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आहे होते. यावेळेस हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना बेल्टने मारहाण करत फ्री स्टाईल हाणामारी केली. दोन्ही नेत्यांची वाहन पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यातूनच आधी दोघांनी एकमेकांना शिवागाळ केली त्यानंतर त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच दोघांची एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
-
-
मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं कडवी नदीचे पाणी रस्त्यावर
मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं कडवी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गावर पाणी आल्यामुळे खबरदारी म्हणून गस्त घालण्यात येत आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची देखरेख करण्यासाठी माणसांची नेमणूक केली गेली आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग गेले चार दिवसांपासून बंद आहे. तसेच केरली, आंबेवाडी महामार्गावर सुद्धा चार ते पाच फूट पाणी आहे. वाठार मार्गे पुणे बंगळुरु महामार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे.
-
“अर्थ मंत्रालयाने या योजनेवर आक्षेप घेतला असेल तर गांभीर्याने बघायला हवं”
आमदार यशोमती ठाकुर यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ वरुन सरकारवर आरोप केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोप ठाकुर यांनी केला आहे. त्या पंढरपुरात बोलत होत्या. अर्थ मंत्रालयाने जर या योजनेवर आक्षेप घेतला असेल तर याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. महाराष्ट्राला आर्थिक तुटीकडे तरी नेले जात नाही ना का हा चुनावी जुमला आहे? ठाकुर म्हणाल्या.
-
गोंदिया :- सडक अर्जुनी तालुक्यातील अतिवृष्टी मुळे चिंगी गावचा संपर्क तुटला.
गोंदिया :- सडक अर्जुनी तालुक्यातील अतिवृष्टी मुळे चिंगी गावचा संपर्क तुटला. खोबावरून चिंगीला जाणाऱ्या मार्ग पुलावरून सतत पाणी वाहत असून त्यामुळे पाण्यामधूनच गावकऱ्यांचे येणे जाणे सुरू आहे. नवेगाव बांध तलाव ओव्हर फ्लो झाल्याने फटका बसला आहे.
-
यवतमाळ जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का. दिग्रस येथील विश्रामगृह येथे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला.
दिग्रस शहरातील गवळीपुरा परिसरातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश.
-
दौंड मधील माजी नगरसेवकासह भावाचा प्रताप,हातात कोयता घेऊन माजवली दहशत
दौंड मधील माजी नगरसेवकासह भावाचा प्रताप,हातात कोयता घेऊन दहशत माजवली. शहरातील श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये घुसून दहशत माजविण्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
फोनवरून शिव्या दिल्याचा जाब विचारण्यासाठी हातात कोयता घेऊन श्रीराम फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. माजी नगरसेवक राजू बारवकरसह सहा जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक नाही.
-
सर्वांनीच मराठवाड्यात जाऊन संवाद साधला पाहिजे – शरद पवार
सर्वांनीच मराठवाड्यात जाऊन संवाद साधला पाहिजे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या प्रश्नात मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटतं. सरकारने जो संवाद साधला पाहिजे होता, तो झाला नाही असं मला वाटतं असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
-
निती आयोगाच्या बैठकीत वाद
निती आयोगाच्या बैठकीत वाद झाला आहे. ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या आहेत. इतर मुख्यमंत्र्यांना वीस मिनिटे बोलायला दिलं पण मला फक्त पाच मिनिटे बोलायला दिलं, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. माईक बंद केल्याचाही ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. हा पश्चिम बंगाल अपमान, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्यात.
-
अजित पवार गटातील नेत्यांना शरद पवार पक्षात घेणार?
काही लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आमची नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली होती, त्याचा विचार आमच्या पक्षात होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.
-
शरद पवार यांची पत्रकार परिषद
शरद पवार आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. त्यांची पत्रकार परिषद सुरु आहे. यावेळी डाव्या पक्षांना महाविकास आघाडीत जागा द्याव्यात. असं माझं मत आहे, असं पवार म्हणाले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आदेश
पुण्यातील पूरग्रस्तांना मदत करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. मात्र सुरुवातीला घरातील धान्य , जीवनावश्यक वस्तू पोहोच करण्याचे आदेश शिंदेंनी दिलेत. पुणे शहरातील फोनवर घेतला आढावा घेतली. शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांना फोनवर शहरातला आढावा घेतला आहे.
-
महायुतीचे तीन बडे नेते दिल्लीत दाखल होणार
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. महायुतीचे तीन बडे नेते दिल्लीत दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल होणार आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युला वर आज चर्चा होणार आहे.
-
नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, फडणवीसांचे आदेश
नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, असे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. बेलापूरमध्ये इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्तांना दिल्या आहेत.
-
पुण्यातील पूर बाधितांची घरांची संख्या जवळपास ३७५ इतकी असून प्रशासनाने केले पंचनामे
पुण्यातील पूर बाधितांची घरांची संख्या जवळपास ३७५ इतकी असून काल प्रशासनाने पंचनामे केले. तहसीलदारामार्फत पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. जिल्हाधिकारी दोन दिवसात अहवाल राज्य शासनाला पाठवणार आहे. ५ दिवसात राज्य शासनाकडून मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
-
पुण्यात महिनाभराचा पाऊस पाच दिवसात पडला
पुण्यात महिनाभराचा पाऊस पाच दिवसात पडला. शहरात २१ ते २५ जुलै या पाच दिवसांत तब्बल २२२.५ मिमी इतका पाऊस झाला. शहरात २०१९ नंतर २४ तासांत झालेला हा सर्वांत मोठा पाऊस आहे. शहरात २१ जुलैपर्यंत हंगामातील एकूण पाऊस ३७४.५ मिमी इतका होता, तर २६ जुलै रोजी ही नोंद ५९६.५ मिलिमीटरवर पोहोचली. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत आणखी दोनशे मिमीची भर पडेल, असा अंदाज आहे.
-
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 3 सप्टेंबर रोजी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही सुनावणी 30 जुलै रोजी होणार होती. त्याबाबत तारीखही अपडेट करण्यात आली होती. परंतु आता ही सुनावणी एक महिन्यांने पुढे ढकलण्यात आल्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी निर्णय होणार का याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
-
उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस असून सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्री परिसरात गर्दी केली आहे. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
-
पुण्यातील एकता नगर परिसरातील वीजपुरवठा अद्याप खंडित
पुणे- पुण्यातील एकता नगर परिसरातील वीजपुरवठा अद्याप खंडित आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली होती. पण गेल्या तीन दिवसापासून या सगळ्या परिसरातील वीज पुरवठा गायब आहे. तीन दिवसांपासून रहिवाशी अंधारातच आहेत.
-
Maharashtra News : देवेंद्र फडणवीस हे पावसाळयात उगवलेल्या छत्रीसारखे – संजय राऊत
“देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळयात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. अलीकडे राजस्थान, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री नेमले गेले ते कोणालाही माहित नव्हते, तसच अनेक अनुभवी नेत्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं. आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
Maharashtra News : औरंगजेब फॅन क्लब गुजरातमध्ये – संजय राऊत
“पक्ष हिसकावला तरी ठाकरेंच नेतृत्व संपलं नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही लोकभावना आहे. फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री. औरंगजेब फॅन क्लब गुजरातमध्ये आहे” अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
-
Maharashtra News : वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल
वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल. भीमा नदीवर असलेला ऐतिहासिक जुना दगडी पूल गेला पाण्याखाली. भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह छोट्या-मोठ्या मंदिरांना पाण्याने घातला वेढा. वीर धरणातून नीरा नदीत सोडले जाते पाणी, निरा आणि भीमा नदीचा माळशिरस तालुक्यात होतो संगम. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा. संध्याकाळपर्यंत हे पाणी कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज.
-
Maharashtra News Live : पुण्यातील भिडे पुलावरील पाणी ओसरलं
Maharashtra News Live : पुण्यातील बाबा भिडे पुलावरचं पाणी ओसरलं
बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातून वाहतुकीला सुरुवात
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने बाबा भिडे पूल गेला होता पाण्याखाली
दोन दिवस या सगळ्या परिसरातून वाहतूक करण्यात आली होती बंद
खडकवासला धरणातून आतापर्यंत 2 TMC पाण्याचा विसर्ग
धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याचा विसर्ग आता करण्यात आला बंद
-
पुणे महानगरपालिका 15 पुलांचे डांबरीकरण करणार
Maharashtra News LIVE : पुणे महानगरपालिका शहरातील 15 पुलांचे करणार डांबरीकरण
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील पुलांची दुरुस्ती करण्यास सुरुवात
पुणे महानगरपालिकेकडून साडेचार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर
पुणे शहरातील उड्डाणपूल नदीवरील पूल रेल्वे उड्डाणपूल अशा 15 ठिकाणी डांबरीकरण करण्यासाठी 4 कोटी 42 लाख रुपयांचा निधी करण्यात आला मंजूर
-
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री असा उल्लेख
Political News Live : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगलीत मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत.उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगली शहरासह जिल्हाभर अशा पद्धतीने शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या डिजिटल फलकांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
-
गोंदियात अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा
Political News Live : गोंदियात अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा
गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळावा
विधानसभा निवडणूक आणि पक्ष संघटनेसाठी घेण्यात आला मिळावा…
मेळाव्याला प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती
प्रफुल्ल पटेल यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
-
निती आयोगाच्या बैठकीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत
Political News Live : निती आयोगाच्या बैठकीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत दाखल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीसाठी दिल्लीत दाखल
Published On - Jul 27,2024 9:06 AM
