WTC Final 2025: AUS vs SA अंतिम सामना अनिर्णित राहिल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी? वाचा…

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ चा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र हा सामना अनिर्णित राहिल्या ट्रॉफी कोणत्या संघाला मिळणार ते जाणून घेऊयात.

WTC Final 2025: AUS vs SA अंतिम सामना अनिर्णित राहिल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी? वाचा...
| Updated on: Jun 08, 2025 | 5:14 PM

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ चा अंतिम सामना ११ ते १५ जून दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, जे इंग्लंडच्या परिस्थितीत खूप घातक ठरु शकतात. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणे अपेक्षित आहे. मात्र जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कोणत्या संघाला ट्रॉफी मिळेल? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आयसीसीचा नियम काय आहे ते जाणून घेऊयात.

जर सामना अनिर्णित राहिला तर…

इंग्लंडमधील खराब हवामानामुळे अनेक सामन्यांमध्ये व्यत्यय आलेला आहे, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्तही पाऊस खोळंबा घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवला आहे. मात्र तरीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर आयसीसी नियम १६.३.३ वापरला जाईल. या नियमानुसार, जर फायनल सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना विजेते मानले जाईल.

बक्षिसाची रक्कम कोणाला मिळणार ?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीतील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अनिर्णित राहिला तर बक्षिसाची रक्कम देखील समान प्रमाणात वाटली जाणार आहे. आयसीसीने आधीच बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला ३.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३०.७ कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघाला २.१६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १८.५३ कोटी भारतीय रुपये दिले जाणार आहेत.

अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर. राखीव खेळाडू: ब्रेंडन डॉगेट

अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, काइल वेरेने, डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, सेनुरान मुथुसामी, डेन पॅटरसन.