“मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत जिंकण्यासाठी भारताला 175 धावांची गरज आहे आणि हातात फक्त पाच विकेट आहेत. भारतासाठी हा मार्ग अत्यंत खडतर आहे. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू जिंकण्यासाठी कशी स्लेजिंग करतात ते पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि तेही चक्क भारतीय खेळाडूच्याच कानात. ऑस्ट्रेलिया जेव्हा खेळातून […]

मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही
Follow us on

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत जिंकण्यासाठी भारताला 175 धावांची गरज आहे आणि हातात फक्त पाच विकेट आहेत. भारतासाठी हा मार्ग अत्यंत खडतर आहे. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू जिंकण्यासाठी कशी स्लेजिंग करतात ते पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि तेही चक्क भारतीय खेळाडूच्याच कानात.

ऑस्ट्रेलिया जेव्हा खेळातून कामगिरी दाखवून देत नाही तेव्हा ते स्लेजिंगचा आधार घेत असतात हा क्रिकेटचा इतिहास आहे. तसंच यावेळीही झालं. मुरली विजय खेळत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने विराट हा चांगला माणूस नसल्याचं चक्क मुरली विजयच्या कानात सांगितलं.

भारताने दुसऱ्या डावात सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार विराट कोहलीसोबत मुरली विजयने 42 धावांची भागीदारी केली. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडूची जादू चालत नसल्याचं पाहून स्लेजिंग सुरु केली. अखेर विराट कोहली 17 धावांवर बाद झाला.

विराट माघारी परतल्यानंतरही स्लेजिंग सुरुच होती. अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी आला तेव्हा नाथन लायनने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. यानंतर टीम पेनने विकेटकीपिंग करत असताना केलेले चाळे माईकमध्ये पकडण्यात आले. मुरली विजयचं लक्ष विचलित करणं हा पेनचा हेतू होता आणि त्यात तो यशस्वी झाला.

मुरली विजयचं लक्ष विचलित करण्यासाठी पेन म्हणाला, “मला माहितीये तो (विराट कोहली) तुझा कर्णधार आहे, मला माहितीये की एक माणूस म्हणून तो तुला आवडत नाही.”

पेनने कानात ही कुजबूज केल्यानंतर मुरली विजयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडू मुरली विजयला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाले. नंतर काही चेंडू खेळून मुरली विजय 20 धावांवर बाद झाला.

पाहा व्हिडीओ :