Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलने दुसऱ्या T20 मॅचमध्ये आफ्रिकेच्या गोलंदाजाला मारला पाय

20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका काल टीम इंडियाने जिंकली.

Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलने दुसऱ्या T20 मॅचमध्ये आफ्रिकेच्या गोलंदाजाला मारला पाय
Yuzvendra Chahal
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 03, 2022 | 11:53 AM

युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) व्हिडीओ सोशल मीडियावर (Socail Media) अधिक व्हायरल होतात. कारण तो कृती अशी करतो की, ती त्याच्या चाहत्यांच्या (Cricket Fan) अधिक पसंतीला पडते. कालच्या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. कालच्या सामन्यात ज्यावेळी चहल मैदानात खेळत असलेल्या खेळाडूंना कोल्डड्रिंक घेऊन आला, त्यावेळी त्याने आफ्रिकेच्या एका खेळाडूला पाय मारला. त्या व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी अधिक कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर शाळेतील सवय अजून गेली नाही असं चाहते म्हणतं आहेत.

कालच्या सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेविरुद्ध दुसरा विजय मिळविला. त्यामुळे टीम इंडियाचे फलंदाज पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण कालच्या मॅचमध्ये सगळ्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली.

T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका काल टीम इंडियाने जिंकली. परंतु गोलंदाजांनी कामगिरी खराब केल्यामुळे कामगिरीत सुधारणा करा असा सल्ला रोहित शर्माने दिला.

दरम्यान मॅच सुरु असताना युझवेंद्र चहलने ड्रिंक्स घेऊन मैदानात आला. त्यावेळी ड्रिंक्स घेण्यासाठी विश्रांती दिली होती. त्यामुळे आफ्रिकेचे सुद्धा काही खेळाडू मैदानात होते. अचानक युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीला मागून पाय मारला. त्यावेळी तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. युझवेंद्र चहलने शम्सीला काल मुद्दाम पाय मारला.