AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आता झिम्बाब्वेच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला
| Updated on: Jul 22, 2026 | 12:50 PM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत आता तीन सामने रंगणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना उद्या रंगणार आहे. उद्या सामना हा 4.30 वाजता सुरु होणार आहे. 4 वाजता नाणेफेक होणार आहे. आता भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करेल कारण मागील दोन मालिका भारतीय संघाने गमावल्या आहेत. या मालिकेतून भारतीय संघ कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यर त्याच्या नेतृत्त्वातील पहिली मालिका जिंकण्यासाठी सज्ज असणार आहे. आता सामना सुरु होण्याच्या 24 तासपूर्वी झिम्बाब्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

झिम्बाब्वेने भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी आपला टी- 20 संघ जाहीर केला आहे. वेस्ली माधेवेरे 12 महिन्यांनंतर झिम्बाब्वेच्या टी- 20 संघात परतला आहे. इतर दोन खेळाडूंना पहिल्यांदाच टी- 20 संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज न्यूमन न्यामुरी आणि यष्टीरक्षक-फलंदाज तफाद्झवा सिगा या दोघांची एन्ट्री झाली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनचा भाऊ, बेन करन, देखील भारताविरुद्धच्या टी- 20 मालिकेत खेळणार आहे. त्याने संघात आपले स्थान कायम ठेवले आहे.

वेस्ली माधेवेरे, न्यूमन न्यामुरी आणि तफाद्झवा सिगा हे त्रिकूट झिम्बाब्वेच्या टी- 20 संघात क्लाइव्ह मदांदे, टिनोटेन्झा म्पोसा आणि शिंगा मुसिकवा यांची जागा घेतील. हे तिन्ही खेळाडू नुकत्याच संपलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत झिम्बाब्वे संघाचा भाग होते. वेस्ली माधेवेरे गेल्या वर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेसाठी शेवटचा टी- 20 सामना खेळला होता. दरम्यान, कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला न्यूमन न्यामुरी झिम्बाब्वेसाठी त्याच्या पहिल्या T20 सामन्याची वाट पाहत आहे. तफादज्वा सिगा याने यापूर्वी केवळ कसोटी खेळल्या आहेत. झिम्बाब्वेच्या टी-20 च्या संघात त्याची ही पहिलीच निवड आहे.

झिम्बाब्वेचा संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवंशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकाजादा, ब्लेसिंग मुझाराबानी, डीओन मायर्स, रिचर्ड नागरवा, न्यूमन न्यामुरी, तफादज्वा सिगाबा, ताफदज्वा सिगाबा.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?