जगातला सर्वात स्वस्त LCD टीव्ही भारतात लाँच

नवी दिल्ली : भारतात आता फक्त तीन हजार 999 रुपयांचा LCD टीव्ही मिळणार आहे. भारतीय कंपनी डीटेलने ‘Detel D1 TV’ ला नवी दिल्लीत एका कार्यक्रमात लाँच केलं. सध्या LED आणि  LCD टीव्हींची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर डीटेल कंपनीने ग्राहकांना परवडेल अशा स्वस्त दरात LCD टीव्ही बाजारात उपलब्ध करुन दिला आहे. Detel D1 …

, जगातला सर्वात स्वस्त LCD टीव्ही भारतात लाँच

नवी दिल्ली : भारतात आता फक्त तीन हजार 999 रुपयांचा LCD टीव्ही मिळणार आहे. भारतीय कंपनी डीटेलने ‘Detel D1 TV’ ला नवी दिल्लीत एका कार्यक्रमात लाँच केलं. सध्या LED आणि  LCD टीव्हींची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर डीटेल कंपनीने ग्राहकांना परवडेल अशा स्वस्त दरात LCD टीव्ही बाजारात उपलब्ध करुन दिला आहे.

Detel D1 TV मध्ये 19 इंचाचा A+ ग्रेड पॅनलचा वापर केला आहे. जो HDMI पोर्ट आणि यूएसबी पोर्ट सोबत मिळतो. इतर टेलिव्हिजन प्रमाणे या टीव्हीमध्येही संगणकाचा वापर तुम्ही करु शकता.  डीटेल कंपनी यावर्षी पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये उतरली आहे आणि आतपर्यंत 7 LED टीव्ही बाजारात लाँच केले आहेत, जे 24 इंच ते 64 इंचाचे आहेत.

डीटेल कंपनीच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या टीव्ही कंपन्यांनाही याचा धक्का बसल्याचे दिसत आहे. जे LED आणि  LCD बाजारात 15 हजार रुपयांपासून विकले जातात. ते टीव्ही कंपनी अवघ्या तीन हजार रुपयांत ग्राहकांना देत असल्यामुळे इतर कंपन्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डीटेल कंपनीचे पाच टीव्ही 15 हजार रुपयांच्या आतमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

·       DETEL 19″ LCD TV (HDR) : 3,999 रुपये.

·       DETEL 24″ IPS FHD LED TV : 6,799 रुपये.

·       DETEL 32″ IPS FHD LED TV : 9,999 रुपये.

·       Detel 32″ DTH LED TV : 10,999 रुपये.

·       DETEL 32″ IPS SMART LED TV : 12,499 रुपये.

 

डीटेल टीव्ही तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.

DETEL 19″ LCD TV (HDR) स्पेसिफिकेशन्स

  • 19 इंच डिस्प्ले
  • A+ ग्रेड पॅनल
  • 12W स्पीकर
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *