भारतात नोकियाचा नवा फोन लाँच, किंमत फक्त....

मुंबई : हल्ली कमी किमतीत जास्त बॅटरी लाईफ असणाऱ्या स्मार्टफोनचा ट्रेंड वाढत आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर तरी चालावा याचा अपेक्षेने फोन खरेदी करतो. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नोकियाद्वारे नोकिया 3.2 हा नवा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनची वैशिष्ट्य म्हणजे हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर चालू …

भारतात नोकियाचा नवा फोन लाँच, किंमत फक्त....

मुंबई : हल्ली कमी किमतीत जास्त बॅटरी लाईफ असणाऱ्या स्मार्टफोनचा ट्रेंड वाढत आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर तरी चालावा याचा अपेक्षेने फोन खरेदी करतो. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नोकियाद्वारे नोकिया 3.2 हा नवा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनची वैशिष्ट्य म्हणजे हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर चालू शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

नोकिया 3.2 या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच एचडी डिस्प्ले आणि 4000 mAh बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात कंपनीद्वारे हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये एक गुगल असिस्टंट बटणसह दोन महत्त्वाचे सॉफ्टवेअर अपडेटही देण्यात आले आहेत. त्याशिवाय या फोनमध्ये अँड्रॉईड वन हे प्रोग्राम देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरियंट देण्यात आले आहे. हा फोन 2GB+16GB आणि  3GB+32GB या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 2GB+16GB फोनची किंमत 8 हजार 990 रुपये आहे. तर 3GB+32GB फोनची किंमत 10 हजार 790 रुपये आहे.

या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याशिवाय या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही बसवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इतर स्मार्टफोनप्रमाणे या फोनमध्ये फेस अनलॉक फिचरही देण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *