एक-दोन नव्हे तब्बल 4 रिअर कॅमेरे, सॅमसंगचा नवा स्मार्टफोन

मुंबई:  सॅमसंग लवकरच तब्बल चार रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. गॅलेक्सी ए 9 अर्थात Galaxy A9 (2018) हा  सॅमसंगचा पहिला चार रिअर कॅमेरे असलेला फोन असेल. येत्या 20 नोव्हेंबरला हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. यापूर्वी तीन रिअर कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होते, पण चार रिअर कॅमेरे असलेला जगातील हा पहिलाच […]

एक-दोन नव्हे तब्बल 4 रिअर कॅमेरे, सॅमसंगचा नवा स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई:  सॅमसंग लवकरच तब्बल चार रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. गॅलेक्सी ए 9 अर्थात Galaxy A9 (2018) हा  सॅमसंगचा पहिला चार रिअर कॅमेरे असलेला फोन असेल. येत्या 20 नोव्हेंबरला हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. यापूर्वी तीन रिअर कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होते, पण चार रिअर कॅमेरे असलेला जगातील हा पहिलाच स्मार्टफोन असेल, असा सॅमसंगचा दावा आहे.

हा स्मार्टफोन मागील महिन्यात मलेशियात लाँच करण्यात आला. मलेशियात या स्मार्टफोनची किंमत 599 युरो म्हणजेच जवळपास 48 हजार 886 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण रिपोर्ट्सनुसार भारतात हा स्मार्टफोन 39 हजार 999 रुपयांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Galaxy A9 चे  फीचर्स

या फोनमध्ये 6.3 इंच फूल एचडी प्लस इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

याचा अस्पेक्ट रेशो 18.5:9 चा आहे. यात सुपर अमोल्ड पॅनलचा वापर करण्यात आला आहे.

प्रोसेसर- क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे.

रॅम – 6GB आणि 8GB,

मेमरी-  128 GB इंटर्नल, मेमरी कार्डने 512 GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – यात चार रिअर कॅमेरे आहेत, याचा प्रायमरी कॅमेरा हा 24 मेगापिक्सलचा आहे, ज्याचं अॅपर्चर f/1.7 इतकं आहे. दुसरा कॅमेरा 10 मेगापिक्सल आहे, जो टेलिफोटो आहे. यात 2X ऑप्टिकल झूम देण्यात आला आहे. तिसरा कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा आहे, ज्यात 120 डिग्री वाइड अँगल लेन्स आहे. याचं अॅपर्चर f/2.4 इतकं आहे. चौथा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा असून हा डेप्थ कॅमेरा आहे. याचं अॅपर्चर f/2.2 इतकं आहे.

या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजीदेखील देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही उपलब्ध आहे.

सध्या प्रसिध्द असलेल्या OnePlus 6T या स्मार्टफोनला सॅमसंगचा Galaxy A9 टक्कर देऊ शकतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.