2018 मधील सर्वात खराब पासवर्ड

मुंबई : जगातील सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये सलग दुसऱ्यावर्षी ‘123456’ हा पासवर्ड टॉपवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हा ‘Password’ पासवर्ड आहे. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच 25 सगळ्यात खराब पासवर्डची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करण्यापूर्वी कंपनीने जगभरातील पन्नास लाखांपेक्षा जास्त अकाउंटसचे संशोधन केले होते. यामध्ये  दहा टक्के लोक …

2018 मधील सर्वात खराब पासवर्ड

मुंबई : जगातील सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये सलग दुसऱ्यावर्षी ‘123456’ हा पासवर्ड टॉपवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हा ‘Password’ पासवर्ड आहे. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच 25 सगळ्यात खराब पासवर्डची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करण्यापूर्वी कंपनीने जगभरातील पन्नास लाखांपेक्षा जास्त अकाउंटसचे संशोधन केले होते. यामध्ये  दहा टक्के लोक सर्वात खराब पासवर्डचा वापर करतात असे दिसून आले.

बरेचजण पासवर्ड लक्षात राहण्यासाठी अगदी साध्या सोप्या शब्दांचा वापर करतात. पण यामुळे, याचा फटका आपल्याला बसु शकतो. आजच्या युगात डिजीटल माध्यमाला जास्त महत्व आले आहे. त्यासोबतच सर्वाधिक यूजर आज मेल, फेसबुकचा वापर करतात. यामध्ये आपल्या वैयक्तिक गोष्टींचाही समावेश असतो. जर आपल्या खराब पासवर्डमुळे अकाउंट हॅक झाले तर याचा वाईट परिणाम घडू शकतो.

ही यादी जाहीर केल्यावर कंपनीने सर्व यूजर्सला सल्ला दिला आहे की, यूजरने नेहमी वेगवेगळ्या अकाउंटसाठी वेगवेगळ्या पासवर्डचा वापर करावा. कारण हॅकर्सला एका अकाउंटसचा पासवर्ड मिळाला तर तो तुमचे इतर अकाउंटसही हॅक करु शकतो. यंदाच्या टॉप 25 च्या यादीत 11 पासवर्डचा नव्याने समावेश आहे.

यामध्ये iloveyou पासवर्डचाही समावेश आहे. सलग दुसऱ्यावर्षी iloveyou पासवर्ड दहाव्या क्रमांकावर आहे. बऱ्याच युजर्सने साध्या पासवर्डचा वापर केलेला आहे. अशा प्रकारचे पासवर्ड हॅकर्स सहज पकडू शकतात. यावर्षी सर्वात जास्त 123456 या पासवर्डचा वापर करण्यात आला आहे. तसेच princess, password, sunshine, qwerty सारखे पासवर्ड वापरले आहेत.

पोजिशन        2018

 1. 123456
 2. Password
 3. 123456789
 4. 12345678
 5. 12345
 6. 111111
 7. 1234567
 8. Sunshine
 9. Qwerty
 10. Iloveyou
 11. Princess
 12. Admin
 13. Welcom
 14. 666666
 15. Abc 123
 16. Fotball
 17. 123123
 18. Monkey
 19. 654321
 20. !@#$%^&*
 21. Charlie
 22. aa 123456
 23. donald
 24. password1
 25. qwerty123
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *