25 कोटी युजर्सचं सिम बंद होणार, तुमचाही नंबर?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई : देशभरातील 25 कोटी मोबाईल युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या 25 कोटी मोबाईल युजर्सचं सिम बंद करणार आहेत. या टेलिकॉम कंपन्यांमध्ये एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन यांचा समावेश आहे. तुम्ही प्रतिमहिना 35 रूपयांपेक्षा कमी रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुमचं सिम कधीही बंद होऊ शकतं. या 25 कोटी मोबाईल युजर्समध्ये सर्वाधिक 2 […]

25 कोटी युजर्सचं सिम बंद होणार, तुमचाही नंबर?
Follow us on

मुंबई : देशभरातील 25 कोटी मोबाईल युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या 25 कोटी मोबाईल युजर्सचं सिम बंद करणार आहेत. या टेलिकॉम कंपन्यांमध्ये एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन यांचा समावेश आहे. तुम्ही प्रतिमहिना 35 रूपयांपेक्षा कमी रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुमचं सिम कधीही बंद होऊ शकतं. या 25 कोटी मोबाईल युजर्समध्ये सर्वाधिक 2 जी मोबाईल युजर्सचा समावेश आहे.

35 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज करण्याऱ्यांमध्ये एअरटेल कंपनीच्या ग्राहकांचा सर्वाधिक समावेश आहे. तब्बल ही संख्या 10 कोटी इतकी आहे. उर्वरीत 15 कोटी ग्राहकांमध्ये आयडिया आणि व्होडाफोन या युजर्सचा समावेश आहे. याचा अर्थ असा की एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन कंपन्यांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी 35 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिजार्च उपलब्ध करुन दिले. मात्र, त्यांना याचा मोठा फटका बसतो आहे.

स्मार्टफोनमुळे देशातील बहुतांश लोक मोबाईलमध्ये डबल सिम वापरतात. तर काही मोबाईल युजर्स दोनपेक्षा अधिक सिम आपल्याकडे बाळगतात. त्यामुळे त्यांना खूप कमी वेळा रिचार्ज करण्याची गरज पडते. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे अशा ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एअरटेलच्या 10 कोटी ग्राहकांनी महिन्याला 10 रुपयांचा रिचार्ज केल्यावर कंपनीच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा होतात. ज्यावेळी एअरटेलचे ग्राहक 35 रुपयांचा रिचार्ज करतील. तेव्हा कंपनीच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच, या निर्णयामागचं दुसरं कारण म्हणजे, 2 जी ग्राहकांना 4 जी मध्ये स्विच करणं होय.