
स्मार्टफोन खरेदी करताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात डिझाइन, कॅमेरा, परफॉर्मन्स आणि किंमत. हे सगळं जर एकाच फोनमध्ये मिळालं, तर कोणाला नको? OPPO ने आपली लोकप्रिय Reno Series पुढे नेत, नव्या टेक्नोलॉजीसह भारतीय बाजारात आणला आहे OPPO Reno 14 5G. अत्याधुनिक फीचर्ससह आणि केवळ ₹37,999 च्या सुरुवातीच्या किमतीत मिळणारा हा फोन सध्या यूजर्समध्ये चर्चेचा विषय ठरतोय.
1. स्टायलिश आणि मजबूत डिझाइन : Reno 14 5G मध्ये दिला आहे अल्ट्रा थिन 1.6mm बेजल, एयरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम, आणि वन पीस कोल्ड-स्कल्प्टेड ग्लास. फोनचा वजन फक्त 187 ग्रॅम आणि जाडी 7.42mm असून हातात घेतल्यानंतर त्याचा सिल्की आणि स्मूथ टेक्सचर खूपच प्रीमियम फील देतो. याच्या व्हेल्वेट ग्लास पर्ल व्हाइट वेरिएंट ने तर डिझाइनच्या बाबतीत नवा ट्रेंड सेट केलाय.
2. दमदार ड्युरेबिलिटी आणि वॉटरप्रूफिंग : हा फोन केवळ सुंदर नाही, तर मजबूतही आहे. प्लास्टिकच्या तुलनेत 200% अधिक मजबूत असणारा हा फ्रेम 36% पर्यंत ड्रॉप प्रोटेक्शन देतो. IP66, IP68 आणि IP69 रेटिंगमुळे पाण्यापासून संरक्षण आणि स्प्लॅश-प्रूफिंग मिळते. गोरिल्ला ग्लास 7i आणि स्पॉन्ज बायोनिक कुशनिंगमुळे तो पडल्यावरही सुरक्षित राहतो.
3. मोठा आणि सुंदर AMOLED डिस्प्ले : 6.59 इंचाचा AMOLED स्क्रीन 93.4% स्क्रीन-टू-बॉडी रेशो देतो. 120Hz रिफ्रेश रेटमुळे गेमिंग, स्क्रोलिंग आणि स्ट्रीमिंगचा अनुभव अतिशय स्मूथ असतो. YouTube, Netflix आणि रील्स पाहताना या डिस्प्लेमुळे मजा येते.
4. प्रोफेशनल AI कॅमेरा सेटअप : OPPO Reno 14 5G मध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP वाइड अँगल आणि 50MP टेलीफोटो लेन्स आहे. 3.5x लॉसलेस झूम आणि 120x डिजिटल झूमसह ही ट्रिपल कॅमेरा सेटिंग फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. 50MP फ्रंट कॅमेरामुळे व्ह्लॉगिंग आणि सेल्फीचा अनुभवही अप्रतिम आहे. 4K HDR 60fps रेकॉर्डिंग, AI Vlog Enhancer, AI Eraser, Underwater Mode अशा अनेक स्मार्ट फिचर्सचा अनुभव घेता येतो.
5. दमदार परफॉर्मन्ससाठी 4nm चा लेग-किलर प्रोसेसर : MediaTek Dimensity 8350 (4nm) चा वापर केल्यामुळे हा फोन उत्तम बॅलन्स देतो – फास्ट आणि पॉवर एफिशियंट. यात 6-core Mali-G615 GPU आणि AI HyperBoost 2.0 मुळे गेमिंगही स्मूथ होते. AI NPU 780 प्रोसेसर, AI Dual Cooling System हे सगळं याला एक हाय-पावर स्मार्टफोन बनवतं.
6. फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची बॅटरी : इतका दमदार फोन असेल, तर बॅटरीही दमदारच लागते. Reno 14 5G मध्ये आहे 6000mAh ची मोठी बॅटरी आणि 80W SUPERVOOC™ फास्ट चार्जिंग. फक्त 10 मिनिटात 6.5 तासांचा YouTube पाहण्याचा वेळ मिळतो. पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 48 मिनिटे लागतात.
7. लेटेस्ट ColorOS 15 आणि AI फीचर्स : फोनमध्ये ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टीम दिलं आहे, जे Trinity Engine, AI Translate, AI Mind Space, AI Call Assistant अशा स्मार्ट फीचर्सने युक्त आहे. यामुळे कामात गती येते आणि यूजर इंटरफेस अधिकच स्मार्ट वाटतो