5G Testing | मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

| Updated on: Jun 01, 2021 | 10:25 PM

दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना शहरी भागात 5 जी अ‍ॅप्लिकेशन्सच्या चाचण्यांसोबत ग्रामीण भागातही या चाचण्या करण्यास सांगितले आहे.

5G Testing | मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स
5G नेटवर्क
Follow us on

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने व्ही (VI), एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओसह (Reliance Jio) दूरसंचार ऑपरेटर्सना ग्रामीण भागात 5 जी (5G) तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना शहरी भागात 5G चाचण्या घेण्यास आधीच परवानगी देण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, एमटीएनएल कंपनीलादेखील 5G टेस्टिंगसाठी परवानगी मिळणार आहे, परंतु त्याआधी त्यांना 5000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. (Airtel, Reliance jio and vodafone idea will start 5G trials in rural India)

दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना शहरी भागात 5 जी अ‍ॅप्लिकेशन्सच्या चाचणीसह ग्रामीण भागातही या चाचण्या करण्यास सांगितले आहे. एमटीएनएलने दिल्लीत 5 जी च्या चाचण्यांसाठी सी-डॉटसोबत काम सुरु केलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ते नजफगडजवळ 5 जी टेस्ट करणार आहेत. कंपनीने शुल्क जमा केल्यानंतर त्यांना ट्रायल स्पेक्ट्रम दिलं जाईल.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी 5G च्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3-6 गीगाहर्ट्झ (GHz) बँड आणि 24.25-28.5 GHz बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.

दूरसंचार मंत्रालयाने 4 मे रोजी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली होती. विभागाने त्यांना चिनी कंपन्यांच्या तंत्राचा वापर न करता 5 जी चाचणी घेण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागाने एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसह 5 जीच्या चाचणीस मान्यता दिली होती. याशिवाय रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocomm) आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन चाचणी घेणार आहे.

10 पट डाउनलोड स्पीड मिळणार

दूरसंचार मंत्रालयाच्या मते, ग्राहकांना 4G च्या तुलनेत 5G तंत्रज्ञानाद्वारे दहापट चांगले डाउनलोड स्पीड आणि तीनपट स्पेक्ट्रम कार्यक्षमता मिळेल. परीक्षणादरम्यान, भारतीय सेटिंगमध्ये 5 जी ची चाचणी केली जाईल. यामध्ये टेली-मेडिसिन, टेली-एज्युकेशन आणि ड्रोन-आधारित कृषी देखरेख आदींचा समावेश असेल. याद्वारे टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या नेटवर्कवर विविध 5G उपकरणांची सहज चाचणी घेण्यास सक्षम असतील.

शहरांसह ग्रामीण भारतातही 5G च्या चाचण्या

सध्या चाचणीचा कालावधी 6 महिने असेल. त्यापैकी उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऑपरेटरला शहरी सेटिंगव्यतिरिक्त ग्रामीण आणि अर्ध-शहरी सेटिंग्जमध्येही चाचणी घ्यावी लागेल, जेणेकरून 5 जी तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातील नागरिकांना मिळेल. ही सेवा केवळ शहरी भागात मर्यादित नसावी. तथापि, आणखी एक उद्योग स्त्रोत असा दावा करतो की, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरला पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये स्पेक्ट्रम वाटप करण्यात आलेले नाही.

इतर बातम्या

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

5G म्हणजे काय? भारतात कधी सुरु होणार? तुम्हाला कोणते फायदे मिळणार? जाणून घ्या सर्वकाही

(Airtel, Reliance jio and vodafone idea will start 5G trials in rural India)