PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

भारतात 5G Technology ची जोरदार तयारी सुरु आहे. 5G म्हणजेच तंत्रज्ञानाची पाचवी जनरेशन. सध्या देशभरात 4G सेवा सुरु आहे. मात्र, 5G आल्यानं नेटवर्कची ताकद आणि इंटरनेटचा वेग कमालीचा वाढणार आहे.

1/5
भारतात 5G Technology ची जोरदार तयारी सुरु आहे. 5G म्हणजेच तंत्रज्ञानाची पाचवी जनरेशन. सध्या देशभरात 4G सेवा सुरु आहे. मात्र, 5G आल्यानं नेटवर्कची ताकद आणि इंटरनेटचा वेग कमालीचा वाढणार आहे.
2/5
5G आल्यानं इंटरनेटवरील कामं वेगानं करणं अगदी सहजसोपं होणार आहे. याशिवाय ऑनलाईन चित्रपट किंवा वेबसीरीज पाहणंही अगदी वेगवान होणार आहे. काहीही डाऊनलोड करणं, कोणतीही वेबसाईट पाहणं किंवा इंटरनेटशी संबंधित कोणतंही काम अगदी काही क्षणात करणं सोपं होणार आहे.
3/5
5G टेक्नॉलॉजीचा परिणाम स्मार्टफोन आणि इतर डिव्हाईसच्या किमतीवरही होईल. 5G सुरु झाल्यानंतर हे तंत्रज्ञान सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनच्या किमतीही वाढतील. म्हणजेच नव्या नेटवर्कला सपोर्ट करणारे मोबाईल आधीच्या तुलनेत काहीसे महागतील. असं असलं तरी 5G आल्यानंतर 4G फोनची किंमत वेगाने कमी होईल.
4/5
याशिवाय जेथे 4G-LTE मार्फत केवळ 40 Mbps डाऊनलोड आणि 25 Mbps अपलोड स्पीड मिळतो तेथे 5G आल्यावर डेटा ट्रान्सफर होण्याचा वेग Gbps होईल.
5/5
5G टेक्नॉलॉजी आल्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) खूपच प्रगत होईल आणि यामुळे स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, होम स्पीकर आणि रोबोट्स खूप वेगाने काम करतील.