
Amazon Sale 2025 सुरू झाला आहे. तर या सेलमध्ये लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत, सेल दरम्यान Lenovo, Acer, Dell सह अनेक मोठ्या ब्रँडचे लॅपटॉप स्वस्तात उपलब्ध करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उत्तम डील बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला आवडतील. जर तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेजल तर लॅपटॉपवर मिळत असलेल्या ऑफर्सचा लाभ घ्या. पण जर तुम्हाला सेल दरम्यान खरेदी करताना अतिरिक्त पैसे वाचवायचे असतील तर यासाठी तुम्ही एक्सचेंज डिस्काउंट आणि बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता.
जर तुम्ही Amazon सेलमध्ये खरेदीसाठी SBI बँक कार्डने पेमेंट केले तर तर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल, बँक डिस्काउंटनंतर तुम्ही हजारो रुपये अतिरिक्त वाचवू शकाल.
16 जीबी रॅम आणि 15.6 इंचाच्या डिस्प्लेसह येणारा हा लॅपटॉप 512 जीबी एसएसडी स्टोरेजसह अमेझॉन सेलमध्ये 17 टक्के सवलतीनंतर 39,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या लॅपटॉपच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, विंडोज 11 आणि एएमडी रायझन 5-यू प्रोसेसरने सुसज्ज आहे.
सेल दरम्यान 31 टक्के सवलतीनंतर हा लेनोवो लॅपटॉप तुम्ही 61,990 रुपयांना खरेदी करू शकता. फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप इंटेल कोर आय7 प्रोसेसर, 16जीबी रॅम, 512 जीबी एसएसडी स्टोरेज, विंडोज 11 आणि बॅकलिट कीबोर्डने सुसज्ज आहे.
या एसर लॅपटॉपमध्ये 512 जीबी एसएसडी स्टोरेज, 8 जीबी रॅम, 15.6 इंच फुल एचडी रिझोल्यूशन डिस्प्ले, विंडोज 11 होम, एएमडी रायझन 3 7330यू प्रोसेसर आहे. अमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये 44 टक्के डिस्काउंटनंतर हा लॅपटॉप तुम्ही 26,990 रुपयांना खरेदी करू शकता.
जिओ ब्रँडचा सर्वात स्वस्त लॅपटॉप 52 % डिस्काउंटनंतर 11,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा अँड्रॉइड 4जी लॅपटॉप मीडियाटेक 8788 ऑक्टा कोर प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज आणि ड्युअल बँड वाय-फाय सारख्या फिचर्ससह येतो.